• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब: शेतातून जाण्याच्या वादातून दोन गटात काठ्यांनी मारामारी; महिलेसह ५ जणांवर गुन्हा

admin by admin
August 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
288
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

शिराढोण: कळंब तालुक्यातील वडगाव (शि.) येथे शेतातून जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारामारीत झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून, याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरोधात शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री सुरेश बंडगर (वय ३०, रा. वडगाव शि.) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. जयश्री बंडगर यांच्यासह गोपाळ बंडगर, युवराज बंडगर, शामल बंडगर आणि दुर्गाबाई बंडगर हे शेताच्या रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले.

शेतातून का जाता, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लाकडी काठ्यांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सर्वांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर जयश्री बंडगर यांनी २६ ऑगस्ट रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी धर्मराज तायप्पा बंडगर, सत्यभामा दुर्गाअप्पा चव्हाण, महादेव तुकाराम बंडगर, तुकाराम गुराप्पा बंडगर आणि यल्लप्पा शेटीबा बंडगर (सर्व रा. वडगाव शि.) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(१),(२),(३३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शिराढोण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

मुरुम: जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर तलवार-पट्ट्याने जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी

Next Post

उमरगा : गॅस कटरने महाराष्ट्र ग्रामीण बँकेची तिजोरी फोडून १९ लाखांची रोकड लंपास

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा : गॅस कटरने महाराष्ट्र ग्रामीण बँकेची तिजोरी फोडून १९ लाखांची रोकड लंपास

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!