कळंब :आरोपी नामे-1)गुड्या प्रकाश काळे, 2) राजु भिमा काळे, 3) सुनिल भिमा काळे, 4) बबन शहाजी शिंदे सर्व रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 25.01.2024 रोजी 19.00 वा. सु. मोहा येथे फिर्यादी नामे-पुजा अनिल शिंदे, वय 25 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पैशाचे देवाण घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कड्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा चुलता शहाजी काळे, व दिर मोतीराम शिंदे हे भांडणसोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने माराहण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पुजा शिंदे यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे-1)निरंजनदत्त रासाहेब पाटील, 2) आक्रोश रामदास कासार, 3) ज्ञानदेव नामदेव मडके रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.25.01.2024 रोजी सायंकाळी 19.45 वा. सु. ग्रामपंचायत कार्यालय समोर मोहा येथे फिर्यादी नामे- बालाजी भागवत झोरी, वय 40 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने फिर्यादीस म्हाणाला की तुझे चुलतभाउ गणपत झोरी यांनी आमचे विरोधात पोलीस ठाणे कळंब येथे नाली खोदले बाबत अर्ज दिल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व पुन्हा जर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यास गेला तर आम्ही सर्वजन तुला जिवे मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी झोरी यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे-1)संतोष सदाशिव झोरी, 2) गणपत सदाशिव झोरी,3) बालाजी भागवत झोरी, 4) शहाजी विश्वनाथ झोरी, 5) नानासाहेब विश्वनाथ झोरी, 6) अष्टविनायक शिवाजी झोरी सर्व रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.25.01.2024 रोजी 19.00 वा. सु. मोहा येथील चौका मध्ये फिर्यादी नामे-निरंजनदत्त रावसाहेब पाटील, वय 57 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने शेत रस्त्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच आक्रोश रामदास कासार व ज्ञानदेव मडके रा. मोहा हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाह करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निरंजनदत्त पाटील यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 323 504, 506, 143, 147 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.