नळदुर्ग : फिर्यादी नामे-पांडुरंग बाबुराव सांडुर, रा. मोतीनगर लातुर ता. जि. लातुर हे त्यांचे कुटूंबासह खंडोबा मंदीर मैलापूर येथे देवदर्शनासाठी रांगेत उभा असताना त्यांचा अंदाजे 8,000 ₹ किंमतीचा रेडमी 9 (ए) मोरपंखी रंगाचा हा दि. 25.01.2024 रोजी 03.00 वा. सु. संशयीत आरोपी नामे- चंद्रकांत अंबादास जाधव, वय 34 वर्षे, रा कवठा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी जबरीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पांडुरंग सांडुर यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी पांडुरंग सांडुर यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयीत आरोपी नामे- चंद्रकांत अंबादास जाधव, वय 34 वर्षे, रा कवठा ता. उमरगा जि. धाराशिव यास मैलापूर येथील खंडोबा यात्रेतुन ताब्यात घेवून त्याचे कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन नळदुर्ग पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-राहुल दाजी इंगळे, वय 35 वर्षे, रा. राजुरी ता. जि. धाराशिव हे त्यांचे त्यांचा भाउ किरण इंगळे व मित्र प्रदिप घोगरे असे खंडोबा मंदीर मैलापूर येथे देवदर्शनासाठी रांगेत उभा असताना फिर्यादी हे वॉशरुमला गेले असता त्यांचे पॅन्टचे खिशातील अंदाजे 12,000 ₹ किंमतीचा वन प्लस मॉडेल कंपनीचा मोबाईल हा दि.25.01.2024 रोजी 16.00 वा. सु. संशयीत आरोपी नामे- आकाश बाळू पवार, वय 25 वर्षे, रा कवठा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी जबरीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल इंगळे यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी राहुल इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयीत आरोपी नामे- आकाश बाळू पवार, वय 25 वर्षे, रा कवठा ता. उमरगा जि. धाराशिव यास मैलापूर येथील खंडोबा यात्रेतुन ताब्यात घेवून त्याचे कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन नळदुर्ग पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.