कळंब :फिर्यादी नामे-सुमेध अंजराव गोरे, वय 35 वर्षे, व्यवसाय ट्रक चालक, र. पिंपळा धायगुडा ता. अंबाजोगाई जि. बीड हे ट्रक मध्ये गॅस सिलेंन्डर भरुन सोलापूर येथुन कळंब मार्गे अंबाजोगाई येथे जात असताना दि. 19.03.2024 रोजी रात्री 02.30 वा. सु. मांजरा पुलावर कळंब ता. कळंब जि. धाराशिव येथे मोटरसायकल क्र एमएच 23 ई 4496 ही ट्रकला आडवे लावून सुमोमधील पाच ते सहा अज्ञात व्यक्तीने सुमेध गोरे यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांचे खिशातील 2,000 ₹ व ट्रक मधील 06 गॅस सिलेंन्डर 18,174 ₹चे असा एकुण 20,174 ₹ किंमतीचा माल जबरदस्तीने काढून घेवून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुमेध गोरे यांनी दि.19.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 395 भा.दं.वि.सं. सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :फिर्यादी नामे- श्रीराम खंडु माने, वय 24 वर्षे, रा. बिजवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.आर. 6975, तसेच दिनेश पारवे यांचा ओपो कंपनीची ए 53 मॉडेलचा मोबाईल अंदाजे 8,000₹, तसेच सौरभ माने यांचा वन पल्स कंपनहचा मोबाईल 15,000₹ असा एकुण 53,000₹ किंमतीचा माल हा दि. 19.03.2024 रोजी 01.00 ते 05.00 वा. सु. बिजनवाडी ते तिर्थ जाणारे रोडचे बाजूस शेतामधील घराचे बांधकामा समोर बिजनवाडी गावातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीराम माने यांनी दि.19.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :दि.18.03.2024 रोजी 14.00 वा. सु. ते दि. 19.03.2024 रोजी 09.30 वा. सु. भोत्रा रोड येथील स्मशानभुमी परंडा येथे काढुन ठेवलेले एकुण 30,000₹ किंमतीचा पांढरा रंग मारलेले लोखंडी पाईप व त्यावर सोलरच्या सुर्यप्रकाशावर चालणाऱ्या 10 आयातकृती सोलर पॅनल व 10 लोखंडी पाईप अशा वर्णननचा सोलर पॅनल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बादेश इब्राहिम मुजावर, वय 59 वर्षे, व्यवसाय- नोकरी वसुली लीपीक नगर पालीका परंडा रा. मुजावर गल्ली दर्गा रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.