धाराशिव – कळंब तालुक्यातील मोहा येथून नगर जिल्ह्यातील जामखेड येथे स्कुटीवरून गांजा घेऊन जात असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन ४० किलोचा गांजा जप्त केला आहे.
दि. 06.07.2024 रोजी 20.45 वा. सु. मोहा रोड येथे बालाजी छगन काळे यांचे शेत गट नं 674 चे लगत आसलेल्या सार्वजनिक रोडवर चार इसम त्यापैकी दोन इसम हे स्कुटी व दोन इसम हे बुलेटवर येत असताना पथकास दिसले त्यांना हात करुन थांबण्याचा ईशारा केला असता ते तेथुन पळून जात असताना पथकाने लागलीच त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी दोन इसमांना पकडले असता बुलेट वरील दोन इसम त्यांच्या ताब्यातील बुलेट व भरलेले पोते जागीच रोडला टाकून अंधाराचा फायदा धेवून तेथुन पळून गेले.
स्कुटीवरील पकडलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याची नावे- सौरभ संजय काळे, वय 24 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब, सोबत विधी संघर्ष बालक यांना पोत्यामध्ये काय आहे असे विचारपुस करता त्यामध्ये गांज्या आसल्याचे सांगून तो बालाजी छगन काळे, रा मस्सा(ख) ता. कळंब व संजय राजेंद्र उर्फ दादा काळे रा. मस्सा(खं) ता. कळंब यांचे कडून विकत घेतला असुन तो आम्ही जामखेड जि. अहमदनगर येथे विक्री करण्याकरीता घेवून जात असल्याचे सागिंतले. तसेच नमुद आरोपीच्या ताब्यातील पोत्यातुन एकुण 20 पाकीटात मिळालेला एकुण 40 किलो 260 ग्रॅम वजनाचा एकुण 8,05,200₹ किंमतीचा गांजा मोटरसायकलसह असा एकुण 10,00,200₹ किंमतीचा माल जप्त करुन पोलीस ठाणे येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8(क), 20(ब), 20(क) अन्वये गुन्हा नोदंवला असुन सदर गुन्ह्या अधिक तपास सहायक्क पोलीस निरीक्षक कांबळे पोलीस ठाणे कळंब हे करत आहेत.