ढोकी :आरोपी नामे- 1)रामा बिरु पवार, 2)बिरु लक्ष्मण पवार, 3) ईश्वर बिरु पवार, 4) शहाजी बिरु पवार, 5) आई हिराबाई पवार, 6) पिंका ईश्वर पवार, 7) सविता रामा पवार, सर्व रा. पारधी पिडी कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांनी दि.30.01.2024 रोजी 10.30 वा. सु. पारधी पिडी कसबे तडवळा येथे फिर्यादी नामे- आक्काबाई देविदास शिंदे, वय 35 वर्षे, रा. पारधी पिडी कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बारेचे स्टार्टर का जाळले या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा सुनिल शिंदे हा भांडणसोडवण्यासाठी आला असता त्यासही नमुद आरोनपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आक्काबाई शिंदे यांनी दि.30.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 323, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे-1) किरण रंगनाथ गाढवे, 2) प्रतिक किरण गाढवे, 3) प्रणव किरण गाढवे, 4) उज्जवला किरण गाढवे सर्व रा.रामवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.30.01.2024 रोजी 18.00 वा. सु. रामवाडी शिवारातील शेत गट नं 156 मध्ये फिर्यादी नामे- विकास हरिश्चंद्र रसाळ, वय 54 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव यांना व शेतमालक सतिश बन्सीलाल सोमाणी यांना नमुद आरोपींना तुमच्या म्हशी ज्वारीच्या पिकात का सोडल्या अशी विचारणा केल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करुन शेतमालक सतिश सोमाणी यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कत्तीने उजव्या हाताच्या अंगठ्यावर मारुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास रसाळ यांनी दि.30.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 326, 323, 447, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.का. कलम 3 (1) (आर) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.