तुळजापूर : फिर्यादी नामे-सुगंधा निलेश बोराडे,वय 25 वर्षे, रा. गुळवंची ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर या त्यांचे कुटूंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी तुळजाभवानी मंदीर शिवाजी दरवाज्या समोर त्यांचा दीड वर्षाचा मुलगा यास काखेत घेवून उभा असताना मुलाचे गळ्यातीज अंदाजे 1,000₹ किंमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम हे आरोपी नामे- शंकर दिलीप दांडेकर, वय 20 वर्षे, रा. कुळधरण ता. कर्जत जि. अहमदनगर यांने दि. 30.01.2024 रोजी 13.30 वा. सु. जबरीने चोरुन नेत असताना त्याचा पाठलाग करुन सुगंधा बोराडे यांनी आसपासच्या लोकांच्या मदतीने नमुद आरोपीस पकडून तुळजापूर पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस पुढील तपास करत आहेत. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुगंधा निलेश बोराडे यांनी दि.30.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : दि.30.01.2024 रोजी 01.30 ते 02.00 वा. सु. स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बलसुर येथील एटीएम मशीनचे कॅश वॉल्ट गॅसकटरने अज्ञात 3 ईसमांनी कापून मशीन मधील अंदाजे 8,26,100₹ चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल अरुण पवार, वय 38 वर्षे, व्यावसाय- खाजगी नोकरी, रा. प्लॉट नं 85 नागराज नगर, तोडकर वस्ती, बाळे उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.30.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम : फिर्यादी नामे- शेषेराव चंद्रशेन बर्वे, वय 51 वर्षे, रा. वंजारवाडी, ता. भुम जि. धाराशिव यांचे अंदाजे 18,000 ₹ किंमतीच्या तीन शेळ्या ह्या दि.23.01.2024 रोजी 23.00 ते दि.24.01.2024 रोजी 03.00 वा. सु. जनावराच्या कोट्यातुन डोंबाळ वस्ती, वंजारवाडी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शेषेराव बर्वे यांनी दि.30.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.