लोहारा :आरोपी नामे-1)अंकुश बब्रुवान अंभुरे रा. समुद्राळ ता. उमरगा जेकापुर कॉलनी मात्रे प्लॉट उमरगा ता. उमरग जि. धाराशिव यांनी दि.11.03.2024 रोजी दुपारी 04.00 वा. सु. समुद्राळ येथील शेत गट नं 53/2 मध्ये मयत नामे- संतोष बब्रुवान अंबुरे, वय 38 वर्षे, रा. समुद्राळ ता. उमरगा जेकापुर कॉलनी मात्रे प्लॉट उमरगा ता. उमरग जि. धाराशिव यांना शेतीच्या वादाचे कारणावरुन काठीने मारहान करुन गंभीर जखमी करुन ठार मारले. अशा मजकुराच्या मयताची आई फिर्यादी नामे- शालुबाई बब्रुवान अंबुरे रा. रा. समुद्राळ ता. उमरगा जेकापुर कॉलनी मात्रे प्लॉट उमरगा ता. उमरग जि. धाराशिव यांनी दि.12.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहार पो. ठाणे येथे 302 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धाराशिव :आरोपी नामे-1)राहुल पवार, 2) राणी पवार, 3) शाम काळे सर्व रा. वासुदेव गल्ली धाराशिव यांनी दि. 10.03.2024 रोजी 17.30 वा. सु.बोंबले हनुमान चौक वासुदेव गल्ली धाराशिव येथे फिर्यादी नामे- श्रेया काशीनाथ राजपुत, वय 16 वर्षे, रा. बोंबले हनुमान चौक वासुदेव गल्ली धाराश्वि ता.जि. धाराशिव हिस व तिचे आईस नमुद आरोपींनी न्यायालयात ओंमकार काळे यांच्या विरुध्द दिलेल्या जबाबाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीचे डावे हाताच्या अंगठ्या जवहील बोटाला चावा घेवून जखमी केले.कोर्टात जबाब दिला तर जिवे ठार मारु अशी धमकी देवून फिर्यादी व फिर्यादीची आई यांच्या जिवाला धोका होईल अशा दिशेने दगडफेक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी श्रेया राजपुत यांनी दि.12.03.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 308, 324, 195 अ, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.