• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात मशिनरीचे दुकान फोडून १७ लाखांची चोरी

admin by admin
December 31, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
672
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा – शहरातील आरोग्य नगरीमधील पाटील मशिनरी दुकान रविवारच्या मध्यरात्री फोडून १७ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. दुकानातील पाण्याच्या मोटारी, केबल वायरसह अन्य साहित्य असे सुमारे १७ ते १८ लाखांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.

चोरीची माहिती सोमवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली. मल्लिनाथ पाटील व प्रशांत पाटील यांचे पाटील कृषी सेवा केंद्र व पाटील मशिनरी असे पत्र्याचे शेड असलेले दुकान आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानातील मोटरी, पंप, विजेचे वायर चोरले. विशेष म्हणजे जड साहित्य नेण्यासाठी चोरटे टेम्पो घेऊन आले होते, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले.

पोलिसांना कळवल्यावर पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. पाहणी करत पंचनामा केला. आमदार प्रवीण स्वामी यांनी भेट देत चोऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. चोऱ्यांचा तपास लावून मुद्देमाल परत मिळवा व आरोपींना अटक करावी, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वर्षभरात चोरट्यांनी १२ घरफोड्यांतून १८ लाख १७ हजार ३०० रुपये, दरोडा व जबरी चोरीतून १ लाख २० हजारांचा तसेच शेती व बांधकाम साहित्य, शेतमाल, केबल, वीज पंप, दुचाकींसह ५१ विविध चोरीतील मिळून एक कोटी २८ लाख ५७ हजारांचा ८०५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिसांनी दोन चोऱ्या २४ हजार, चार घरफोड्या १ लाख ५९ हजार ५०० तर १५ विविध चोरीतील ८ लाख ८४ हजारांचा मिळून २९ गुन्ह्यांमध्ये १० लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह २६ आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींसह चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले नाही.

Previous Post

उमरगा येथील युवकावर मुळज गावात खुनी हल्ला

Next Post

खामसवाडी पाझर तलाव क्र. १ च्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार

Next Post
खामसवाडी पाझर तलाव क्र. १ च्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार

खामसवाडी पाझर तलाव क्र. १ च्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार

ताज्या बातम्या

पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

धाराशिवमध्ये खळबळ! शारदा निकेतन हायस्कूलमधून १२ वर्षीय बालकाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांची शोधमोहीम सुरू

July 18, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

लोहाऱ्यात ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक करून तब्बल ५ लाखांचा गंडा!

July 18, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

भूम तालुक्यात खळबळ!  पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

July 18, 2026
कळंबमध्ये दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगाराला अटक

कळंबमध्ये दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगाराला अटक

July 18, 2026
तुळजापूर-सोलापूर हायवेवर मध्यरात्री थरार! तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई

तुळजापूर-सोलापूर हायवेवर मध्यरात्री थरार! तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई

July 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!