धाराशिव: खामसवाडी (ता. कळंब) येथील पाझर तलाव क्र. १ च्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत प्रज्योत माने यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
माने यांच्या म्हणण्यानुसार, गुत्तेदार, अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित समिती यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांची कामे केली आहेत. त्यांनी सुरू असलेली कामे थांबवून, झालेल्या कामांची देयके शासनात जमा करावीत आणि संबंधित दोषींवर कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
यापूर्वी १९ डिसेंबर २०२४ रोजी माने यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यांचे आत्मदहन स्थगित केले होते. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने माने यांनी पुन्हा आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
माने यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता यांनाही याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान , माने यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे जिल्हा परिषद परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
व्हिडिओ पाहा