• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर बसस्थानकावर पुन्हा धाडसी चोरी! नांदेड बसमध्ये चढताना सोलापूरच्या महिला भाविकाचे ५० हजारांचे मिनीगंठण लंपास

admin by admin
June 2, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: श्री क्षेत्र तुळजापूर येथील बसस्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, रविवारी एका मुंबईच्या भाविकाची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी पुन्हा एका महिला भाविकाचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या अफाट गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिला भाविकाच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण शिताफीने चोरून नेले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती लहू माळी (वय ३७, रा. बार्शी, जि. सोलापूर) असे चोरी झालेल्या महिला भाविकाचे नाव आहे.

बसमध्ये चढताना गर्दीत साधला डाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी असलेल्या स्वाती माळी या सोमवार, दि. १ जून रोजी कुलस्वामिनी आय भवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आल्या होत्या. दर्शन आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी दुपारी सव्वाएक वाजेच्या सुमारास त्या तुळजापूर बसस्थानकावर आल्या.

या दरम्यान बसस्थानकावर ‘सोलापूर ते नांदेड’ ही बस आली. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडाली होती. स्वाती माळी या बसमध्ये चढत असताना, आधीच पाळत ठेवून असलेल्या एका अज्ञात भामट्याने गर्दीचा गैरफायदा घेतला. त्याने स्वाती यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण अत्यंत शिताफीने ओरबाडून घेतले आणि गर्दीत गायब झाला. बसमध्ये बसल्यानंतर गळ्यातील दागिने गायब असल्याचे स्वाती यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र चोरटा पसार झाला होता.

तुळजापूर पोलिसांत गुन्हा नोंद

या मोठ्या चोमीनंतर स्वाती लहू माळी यांनी तातडीने तुळजापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण:

तुळजापूर बसस्थानकावर लागोपाठ दोन दिवसांत दोन भाविकांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसस्थानक परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Previous Post

कळंब तालुक्यात दोन ठिकाणी टोळक्यांचा राडा! लग्नाच्या कार्यक्रमात बिअरची बाटली अन् लोखंडी पाईपने मारहाण; १४ जणांवर गुन्हे दाखल

Next Post

धाराशिवमध्ये मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या ‘डॉल्बी डीजे’वर पोलिसांची कारवाई; सोलापूरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या 'डॉल्बी डीजे'वर पोलिसांची कारवाई; सोलापूरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!