• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

 ओमराजेंची 'गुगली' आणि फेसबुक पिंट्यांची जळजळ!

admin by admin
June 19, 2026
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भूकंप कमी आणि ‘हृदयपरिवर्तन’ जास्त होत आहे. ठाकरे गटाचे उरलेसुरले सहा खासदार आता ‘गुवाहाटी-रिटर्न’ एकनाथ भाऊंच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांनी चांगलाच धुरळा उडवून दिला आहे. पण या सगळ्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेत ते धाराशिवचे ‘फायरब्रँड’ नेते, एकदा आमदार आणि दोनदा खासदार राहिलेले ओमराजे निंबाळकर!

निष्ठा ‘शिफ्ट’ झाली, पण शिवसेना तीच!

कालपर्यंत मातोश्रीवर निस्सीम भक्ती दाखवणारे, जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा शिंदे गटावर शब्दांच्या तोफा डागणारे कट्टर शिवसैनिक ओमराजे आता अचानक “जय महाराष्ट्र” करत एकनाथ भाऊंच्या दरबारात हजेरी लावणार आहेत. पण त्यांचं स्पष्टीकरण ऐकून भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्कर येईल.

ओमराजेंचा युक्तिवाद अगदी सोप्पा आणि सुटसुटीत आहे: “मी शिवसेना कुठे सोडली? मशाल सोडून फक्त शिवधनुष्य पुन्हा हाती घेतलंय! बाळासाहेब आमचे श्रद्धास्थान कालही होते आणि आजही आहेत… फक्त नेतृत्वाचा ‘ब्रँड’ बदललाय. उद्धव साहेबांऐवजी आता एकनाथ भाऊ!”

काय हा निष्ठावान युक्तिवाद! साक्षात राजकारणातील तत्त्वज्ञानाचा हा नवा धडाच आहे. थोडक्यात सांगायचं तर, गाडी तीच आहे, फक्त ड्रायव्हर बदललाय!

मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या ‘पगारी’ ट्रोल्सचा आक्रोश

ओमराजेंच्या या राजकीय ‘उडी’मुळे सगळ्यात जास्त पोटशूळ कोणाला उठला असेल? तर त्यांच्या कट्टर समर्थकांना नाही, तर ‘मल्लू नेरुळकर’ आणि त्यांच्या पगारी ‘ट्रोल आर्मी’ला! आता ओमराजेंवर ‘गद्दार… गद्दार…’ म्हणून सोशल मीडियावर जो काही चिखलफेकीचा पाऊस पडतोय, तो पाहण्यासारखा आहे.

पण इथे एक भयंकर विनोद दडलेला आहे. ज्या मल्लू नेरुळकरांच्या आजोबांनी त्यांच्या काळात तब्बल पाच वेळा आणि वडिलांनी दोन वेळा पक्षबदलाचा ‘खेळ’ केला, त्यांचाच नातू आता ओमराजेंना निष्ठेचे डोस पाजतोय! म्हणजे स्वतःच्या बाप-आजोबांनी केले ते ‘राजकीय कसब’ आणि ओमराजेंनी केली ती ‘गद्दारी’! हा कुठला न्याय? मल्लू साहेब, आधी स्वतःचा राजकीय डीएनए तपासा, मग दुसऱ्यांच्या निष्ठेच्या सर्टिफिकेटवर सह्या करा!

‘फेसबुक पिंट्या’ गँगसाठी डोकेदुखी

धाराशिव जिल्ह्यात जो ‘मल्लू पर्व’ नावाचा प्रपोगंडा जोरात सुरु होता, त्याची आता हवाच गुल होणार आहे. एकीकडे मुरूमकर बसवराज पाटील आमदार आणि दुसरीकडे ओमराजे निंबाळकर सत्तेत जाऊन बसणार! याचा सरळ अर्थ असा की मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या त्या ‘फेसबुक पिंट्या’ गँगसाठी ही निव्वळ डोकेदुखी नसून, एक प्रकारची राजकीय ‘मायग्रेन’चीच गोळी ठरणार आहे. कीबोर्डवर क्रांती करणारे हे ‘पिंट्ये’ आता फक्त रडक्या इमोजी टाकण्यापुरते उरतील.

कार्यकर्ते खुश, कारण ‘निधी’ आला रे आला!

एकीकडे फेसबुकवर युद्ध सुरु असताना, दुसरीकडे ओमराजेंचे तब्बल ७५ टक्के समर्थक आतल्या आत भलतेच खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू लपत नाहीये. कारण शेवटी निष्ठेपेक्षा ‘निधी’ जास्त महत्त्वाचा असतो ना! साहेबांनी सत्ताधारी गटात उडी मारल्याने आता रखडलेली टेंडरं, विकासकामे आणि कार्यकर्त्यांची ‘सोय’ सगळं काही झटपट मार्गी लागेल, ही त्यांना पक्की खात्री आहे. सत्ताधारी पार्टीत गेल्यावर जी ‘कामं’ होतात, त्याची मज्जा काही औरच असते, हे या पठ्ठ्यांना चांगलंच ठाऊक आहे.

थोडक्यात काय…

महाराष्ट्राच्या या राजकीय नाट्यात जुने डायलॉग नव्या कलाकारांकडून ऐकायला मिळत आहेत. “आम्ही शिवसेना सोडलीच नाही” हा आता महाराष्ट्राचा आवडता राष्ट्रीय जोक झाला आहे. असो, ओमराजेंच्या नव्या ‘धनुष्यबाण’ प्रवासाला शुभेच्छा आणि मल्लूच्या ‘फेसबुक पिंट्यांना’ बर्नॉलची मोफत पाकिटे मिळोत, एवढीच सदिच्छा!

– बोरूबहाद्दर

Previous Post

लाचखोर पोलिसाला संशय आल्याने ‘ट्रॅप’ हुकला, पण एसीबीचा दणका; छेडछाडीची तक्रार मिटवण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोणच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा!

Next Post

धाराशिव जिल्हा हादरला! तुळजापुरात भावाला ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तर मुरुममध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्हा हादरला! तुळजापुरात भावाला ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तर मुरुममध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

ताज्या बातम्या

बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिवमध्ये दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर बॉम्बस्फोटाचा बनाव!

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन चोरीचे गुन्हे; सौर प्रकल्पातील केबलसह अवैध वाळू साठ्याप्रकरणी गुन्हे दाखल

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम – छोटा हत्ती’ गाडीतून ४ गोवंशीय जनावरांची सुटका; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे जुन्या वादातून राडा!

August 4, 2026
धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

August 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!