शिराढोण: गोविंदपूर येथे एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोविंदपूर येथील सरकारी दवाखान्याच्या मागे असलेल्या हबीब महबूब शेख यांच्या चिकनच्या दुकानासमोर ही घटना घडली.
दयानंद पिटू कांबळे (वय २८, रा. देवधानोरा) हे दुकानाजवळ असताना समादान उर्फ मिंटू अमृत मुंडे (रा. गोविंदपूर) याने त्यांना “काय चालले मिटू दादा” असे म्हणण्यावरून वाद घातला. त्यानंतर आरोपीने दयानंद यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या मोटरसायकलचेही नुकसान केले.
या घटनेनंतर दयानंद कांबळे यांनी २१ जानेवारी रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून समादान मुंडे याच्याविरुद्ध भादंवि कलम १०९(१), ३२४(२), ३५२, ३५१(२) सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम ३(१)(आर)(एस), ३(२)(व्हिए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.