मुरुम – धाराशिव जिल्ह्यातील मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुर्दैवी घटनेत 21 महिन्यांच्या बालकावर हल्ला करण्यात आला आहे.
दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता कोथळी बसस्थानकावर बाशा अल्लाउद्दीन दफेदार या आरोपीने निळकंठ बाबुराव कोटटरगे यांचा 21 महिन्यांचा मुलगा बाबुराव यास मागील भांडणाच्या कारणावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रशांत सिद्राम सलारे यांच्या हातातून हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपीने बाबुरावला 8 फूट उंचीवरून मागे फेकून दिले. या हल्ल्यात बाबुराव गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुरुम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निळकंठ कोटटरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाशा अल्लाउद्दीन दफेदार विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 109, 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.