• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘दम असेल तर समोर या – मनोज जरांगे पाटील

‘मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारला सद्बुद्धी दे’

admin by admin
August 8, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण: एक धगधगती ज्योत…
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, सरकारकडून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा दावा केला.

तुळजाभवानी मातेच्या दरबारात साकडे घालताना, ‘मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारला सद्बुद्धी दे’, अशी प्रार्थना केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाशी संबंधित काही कागदपत्रे माध्यमांसमोर दाखवली. खरी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे असतानाही ती रद्द केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जातपडताळणी समितीतील काही अधिकारी पैशांची मागणी कागदावरच लिहून करत असल्याचा आरोप करत, त्यासंदर्भातील कागदपत्रे असल्याचा दावा त्यांनी केला.

बावनकुळे यांच्या पत्राचा दाखला

मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचाही यावेळी दाखला दिला. मराठा आरक्षणाशी संबंधित नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘सरकार ५८ लाख नोंदी रद्द करण्यासाठी समाजाला भ्रमित करत आहे,’ असा आरोप जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी हा प्रकार थांबवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘सरकार षड्यंत्र रचत आहे’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आरोप करताना जरांगे पाटील यांनी, सरकारकडून षड्यंत्र सुरू असल्याचा दावा केला. आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचे तसेच लाठीहल्ला करण्याचे आदेश देण्यासाठी पत्रव्यवहार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘दम असेल तर समोर या,’ असे आव्हानही जरांगे पाटील यांनी सरकारला दिले.

दरम्यान, तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Previous Post

६ महिन्यांत ३ अध्यक्ष! ‘ऑपरेशन रोचकरी’, पाठीत खुपसलेले खंजीर अन् साहेबांचा ‘मीच मुख्यमंत्री’ सिंड्रोम!

Next Post

पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी गजाआड; चार आरोपींना बेड्या

Next Post
पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी गजाआड; चार आरोपींना बेड्या

पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी गजाआड; चार आरोपींना बेड्या

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील शिराढोण शिवारात वृद्धावर तुफान हल्ला!

August 9, 2026

Recent Posts

  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
  • धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!
  • मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल
  • कळंब तालुक्यातील शिराढोण शिवारात वृद्धावर तुफान हल्ला!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!