• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

६ महिन्यांत ३ अध्यक्ष! ‘ऑपरेशन रोचकरी’, पाठीत खुपसलेले खंजीर अन् साहेबांचा ‘मीच मुख्यमंत्री’ सिंड्रोम!

धाराशिव भाजप 'कुरुक्षेत्र' नवा अंक -3

admin by admin
August 8, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
६ महिन्यांत ३ अध्यक्ष! ‘ऑपरेशन रोचकरी’, पाठीत खुपसलेले खंजीर अन् साहेबांचा ‘मीच मुख्यमंत्री’ सिंड्रोम!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव भाजपमध्ये सध्या पक्ष चाललाय की ‘सर्कस’, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. राजकारणात दररोज नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘राणा प्रायव्हेट लिमिटेड’ने आता असा एक जागतिक विक्रम केला आहे, जो गिनिज बुकमध्ये नोंदवण्यासारखा आहे! विक्रम कसला? तर अवघ्या ६ महिन्यांत भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) तब्बल तीन अध्यक्ष बदलण्याचा!

अहो, देशात एका जिल्ह्याला एकच अध्यक्ष असतो, पण आपल्या धाराशिवमध्ये साहेबांनी ६ महिन्यांपूर्वी चक्क ‘दोन’ अध्यक्ष नेमले! (१. राहुल काकडे – धाराशिव, २. प्रतीक रोचकरी – तुळजापूर). एकाच म्यानात दोन तलवारी ठेवण्याचा हा प्रयोग का झाला आणि यातून साहेबांनी कसा ‘गेम’ केला, याची ही राजकीय थ्रिलर स्टोरी भल्याभल्यांना चक्रावून टाकणारी आहे.

‘ऑपरेशन रोचकरी’: गाजर, ऑफर्स आणि बंपर प्रवेश!

ही कथा सुरू होते २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी. प्रतीक रोचकरी हे तुळजापूरचे धडाडीचे युवा नेते. मुळात ते शिवसेना (ठाकरे गट) आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर समर्थक! रोचकरी यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आणि त्यांची वाढती ताकद पाहून साहेबांच्या (राणा पाटील) छातीत धडकी भरली.
मग काय? साहेबांच्या पत्नी, अर्थात ‘माऊली’ (अर्चना पाटील) थेट रोचकरी यांच्या घरी पोहोचल्या आणि भाजप प्रवेशाची ‘ऑफर’ दिली. पण रोचकरी पठ्ठ्या ओमराजेंचा कट्टर समर्थक, त्याने थेट नकार दिला. त्यानंतर मध्यस्थांची फौज कामाला लागली. अखेर स्वतः साहेब मैदानात उतरले आणि त्यांनी प्रतीक रोचकरींना “तुला तुळजापूरचा उपनगराध्यक्ष आणि भाजयुमोचा जिल्हाध्यक्ष करतो,” असे भक्कम ‘गाजर’ दाखवले!
भाजपसारखा मोठा पक्ष आणि साहेबांचा शब्द, यामुळे रोचकरी यांनी होकार दिला. त्यांनी स्वतःच्या खिशाला चाट लावून, पदरमोड करत तब्बल १७ सरपंच आणि ३,००० कार्यकर्त्यांची फौज घेऊन तुळजापुरात भाजपमध्ये दणदणीत प्रवेश केला. विधानसभेत रोचकरींनी स्वतःचा घाम गाळून साहेबांचा हिरीरीने प्रचार केला. साहेब निवडून आले… आणि इथूनच सुरू झाला साहेबांचा ‘खंजीर प्रयोग’!

प्रतीक रोचकरींच्या पाठीत सपासप ३ खंजीर!

रोचकरींचे ते ३००० लोकांचे शक्तीप्रदर्शन पाहून साहेबांच्या डोळ्यांत खुपू लागले. “हा पोरगा उद्या आपल्याच अंगावर येईल,” या भीतीने साहेबांनी रोचकरींच्या पाठीत एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा खंजीर खुपसला!
  • खंजीर पहिला (अध्यक्षाची ‘टोपी’):
    साहेबांनी तुळजापुरात रोचकरींना “तूच आमचा भाजयुमो जिल्हाध्यक्ष” म्हणून हार-तुरे घातले. पण प्रत्यक्षात मुंबईला वरिष्ठांकडे कुणाचे नाव पाठवले? तर स्वतःचे चिरंजीव ‘मल्हार पर्वा’चे कट्टर समर्थक राहुल काकडेंचे! बिचारे प्रतीक रोचकरी जेव्हा मुंबईला भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षांना भेटायला गेले, तेव्हा प्रदेशाध्यक्षांनी सांगितले, “अहो, तुमचे नावच नाहीये इकडे!” तिथे रोचकरींना कळले की आपल्यासोबत मोठा गेम झालाय.
  • खंजीर दुसरा (नगरपालिकेचे तिकीट कट):
    उपनगराध्यक्ष पदाचे गाजर दाखवून पक्षात आणलेल्या रोचकरींना नगरपालिकेची निवडणूक लागल्यावर उपनगराध्यक्षपद तर सोडाच, साधं नगरसेवकाचं तिकीटही साहेबांनी दिले नाही.
  • खंजीर तिसरा (पंचायत समितीचा ‘गेम’):
    नगरपालिकेत गेम झाल्यावर साहेबांनी मलमपट्टी म्हणून “तुला दोन वर्षे पंचायत समितीचा सभापती करतो,” असा नवा शब्द दिला. रोचकरींनी चिवरी गणातून सर्व तयारी केली. त्यांनी बंडखोरी करू नये म्हणून त्यांना शेवटपर्यंत “फॉर्म भरून ठेव” असे सांगण्यात आले, पण ऐन वेळी त्यांना तिकीट नाकारून त्यांचा ‘राजकीय खून’च करण्यात आला!
थोडक्यात सांगायचे तर, राणा पाटील किती ‘विश्वासघातकी’ राजकारण करू शकतात, याची ही जिवंत आणि थ्रिलर स्टोरी स्वतः प्रतीक रोचकरी कधीही पुराव्यांसहित सांगू शकतील!

साहेबांचा एकच धर्म: “मीच इथला मुख्यमंत्री!”

या सर्व घटनाक्रमावरून साहेबांचा (राणा पाटील) एकच राजकीय गुणधर्म पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे- “आपल्यापेक्षा जिल्ह्यात कुणीही मोठा होता कामा नये!”
जिल्ह्यात कुणाचेही नेतृत्व उभे राहू द्यायचे नाही, निष्ठावंतांचे पद्धतशीर पंख छाटायचे आणि स्वतःच या जिल्ह्याचे “मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्वेसर्वा” असल्याच्या अविर्भावात वावरायचे, हाच साहेबांचा अजेंडा आहे. याच असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी रोचकरींसारख्या धडाडीच्या युवा नेत्याचा राजकीय बळी घेतला.

पिक्चर अभी बाकी है: देवाभाऊंचे होर्डिंग कुणी काढले?

पण थांबा! राणा गटाचे प्रताप एवढ्यावरच थांबत नाहीत. निष्ठावंतांना डावलण्यासोबतच त्यांनी थेट राज्याचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांच्याशीही पंगा घेतल्याची कुजबूज आहे.
जेव्हा देवाभाऊ तुळजापूरच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा शहरात लागलेले ‘देवाभाऊंचे होर्डिंग्ज’ रातोरात काढायला कुणी लावले होते? स्वतःला जिल्ह्याचे ‘मुख्यमंत्री’ समजणाऱ्या साहेबांना देवाभाऊंची हवा सहन झाली नव्हती का? याची भन्नाट आणि खळबळजनक ‘इन्साईड स्टोरी’ आता लवकरच उघड होणार आहे!

Previous Post

‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

ताज्या बातम्या

६ महिन्यांत ३ अध्यक्ष! ‘ऑपरेशन रोचकरी’, पाठीत खुपसलेले खंजीर अन् साहेबांचा ‘मीच मुख्यमंत्री’ सिंड्रोम!

६ महिन्यांत ३ अध्यक्ष! ‘ऑपरेशन रोचकरी’, पाठीत खुपसलेले खंजीर अन् साहेबांचा ‘मीच मुख्यमंत्री’ सिंड्रोम!

August 8, 2026
‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

August 8, 2026
‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

August 8, 2026
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: आणखी २० अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीची टांगती तलवार

August 8, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

मोडक्या शाळा, तडफडणारे रुग्ण आणि ‘व्हिजन २०३०’ च्या नावाखाली नेत्यांना हवीत दीड कोटींची ‘नवी कोरी’ वाहने!

August 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!