• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

२२ कोटी खर्चूनही कृषी विभागाकडे हिशेब नाही!

आमदार कैलास पाटलांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर; नियोजन समितीच्या बैठकीत दुष्काळाऐवजी पर्यटनाला प्राधान्य

admin by admin
May 2, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
२२ कोटी खर्चूनही कृषी विभागाकडे हिशेब नाही!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव:  येथील नियोजन भवनात महाराष्ट्र दिनी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत कृषी विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मागील खरीप हंगामात कृषी निविष्ठांवर तब्बल २२ कोटी रुपये खर्च होऊनही त्याची कोणतीही माहिती  देता न आल्याने आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दुसरीकडे, जिल्ह्यात संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र याकडे दुर्लक्ष करत पर्यटन विकासाच्या सादरीकरणाला प्राधान्य दिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

२२ कोटी गेले कुठे?

बैठकीत कृषी विभागाच्या वतीने पीपीटी सादरीकरण सुरू असताना आमदार कैलास पाटील यांनी खरीप २०२५ मध्ये शेतकरी गटांना वितरित केलेल्या कृषी निविष्ठांची सविस्तर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्याकडे मागितली. मात्र, मोरे यांनी ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगताच बैठकीत खळबळ उडाली. ज्या योजनेवर तब्बल २२ कोटी रुपयांचा मोठा निधी खर्च झाला आहे, त्याची साधी माहितीच आढावा बैठकीत उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत, ‘अशा योजना खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का?’ असा खडा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही.

फक्त बियाणे वाटून संपूर्ण किटचे बिल

यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. शेतकरी गटांना कृषी निविष्ठा किटमध्ये केवळ बियाण्यांचे वाटप केले जाते आणि इतर साहित्य न देताच संपूर्ण किटचे बिल मात्र वेळेवर काढले जाते, असा आरोप त्यांनी पालकमंत्र्यांसमोरच केला. भूम येथील एका गोदामात मागील आठवड्यात खरीप हंगामातील बियाण्यांचा साठा आढळून आल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी वितरण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.

‘चावडी वाचन’ करण्याची मागणी

शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक योजनेचे ‘चावडी वाचन’ करण्यात यावे, तसेच लाभार्थ्यांच्या याद्या सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. या गोंधळाची दखल घेत, आमदार राणा पाटील यांनी सोमवारपर्यंत शेतकरी गटांना वितरित करण्यात आलेल्या साहित्याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दुष्काळाकडे दुर्लक्ष, पर्यटनाचे ‘प्रेझेंटेशन’

दरम्यान, या महत्त्वाच्या बैठकीत संभाव्य दुष्काळ आणि चारा-पाणी टंचाईसारख्या गंभीर विषयाला मात्र प्रशासनाकडून बगल देण्यात आली. बैठकीच्या शेवटी आमदार कैलास पाटील यांनी ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर आणि मान्सून उशिरा येण्याच्या हवामान विभागाच्या अंदाजामुळे जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या चारा व पाणी टंचाईकडे लक्ष वेधले. यासाठी प्रशासनाने सज्ज राहून तातडीने उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.

मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पालकमंत्र्यांनी पर्यटन विकासासंदर्भातील सादरीकरणाला अधिक प्राधान्य दिले. खाजगी कन्सल्टंटकडून पर्यटन प्रकल्पांचे ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ पाहण्यातच बैठकीचा अधिक वेळ खर्ची पडला. परिणामी, चारा व पाणी टंचाईसारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर कोणतीही ठोस चर्चा न झाल्याने, प्रशासनाचे प्राधान्यक्रम नक्की कोणते आहेत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Previous Post

जिल्ह्यात भुरट्या चोऱ्यांचा सुळसुळाट; गर्दीचा फायदा घेत दोन महिलांचे दागिने लांबवले, तर एकाची दुचाकी पळविली

Next Post

धक्कादायक: धाराशिव जिल्ह्यात महिला अन् अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आंबी आणि भूम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धक्कादायक: धाराशिव जिल्ह्यात महिला अन् अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आंबी आणि भूम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!