• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: हॉस्पिटल परिसरातून तरुणाची मोटरसायकल चोरी; गुन्हा दाखल

admin by admin
July 10, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
556
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  शहरातील रामनगर भागातील चिरायु हॉस्पिटलसमोरून एका तरुणाची सुमारे ३५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३ जुलैच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण बाबुराव राठोड (वय २४ वर्षे, मूळ रा. जळकोट, ता. तुळजापूर) हे सध्या रामनगर येथे राहतात. त्यांनी आपली होंडा कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच २५ ए.व्ही. ६१३५) ३ जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चिरायु हॉस्पिटलजवळ उभी केली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता त्यांना आपली मोटरसायकल जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर त्यांनी ९ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

उमरगा बसस्थानकातून कर्नाटकच्या प्रवाशाची मोटारसायकल लंपास; अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल

उमरगा- उमरगा बसस्थानक परिसरातून तब्बल अडीच महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या मोटारसायकल प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक येथील एका प्रवाशाची सुमारे २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज साहेबान्ना गुत्तेदार (वय ४८ वर्षे, रा. जवळगा जे, ता. आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी ही तक्रार दिली आहे. गुत्तेदार यांची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. के.ए. ३२ ई.एक्स. ५६०९) दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी रात्री २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास उमरगा बसस्थानक परिसरातून चोरीला गेली होती.

या चोरीच्या घटनेनंतर तब्बल अडीच महिन्यांनी, म्हणजेच ९ जुलै रोजी बसवराज गुत्तेदार यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. तक्रार देण्यास इतका विलंब का झाला, यासह पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

पाडोळीत शेतजमिनीच्या वादातून वृद्ध महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव: ई-सिमद्वारे ॲक्सेस मिळवून शेतकऱ्याच्या खात्यातून १.८१ लाख रुपये लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव: ई-सिमद्वारे ॲक्सेस मिळवून शेतकऱ्याच्या खात्यातून १.८१ लाख रुपये लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

July 30, 2026
भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

July 30, 2026
धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

धाराशिव भाजप भवनावरून कायदेतज्ज्ञांत रंगला ‘कलगीतुरा’!

July 29, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

‘कार्यारंभ आदेश’ अन् मालकीणीचा दम! धाराशिव भाजपचा भाड्याचा संसार अन् निष्ठावंतांचा ‘सहनशील’ स्वाभिमान!

July 29, 2026
‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

July 29, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!