तुळजापूर : तालुक्यातील काक्रंबा येथील मुरलीधर साठे (५०) यांचा १५ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी फरार असलेल्या कारचालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर साठे हे १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान काक्रंबा ते तुळजापूर जाणाऱ्या रस्त्यावरून मोटरसायकलने जात होते. सोनार पट्टीजवळ पुलावरून जाताना भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात साठे गंभीर जखमी झाले. मात्र, कारचालक मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पसार झाला. साठे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताच्या पत्नी अर्चना साठे यांनी ९ सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी फरार कारचालकाविरुद्ध भादंवि कलम २८१, १२५(ब), १०६(१) सह मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब), १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.