धाराशिव – दरवर्षीप्रमाणे या वर्षी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाकडून मुंबई येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवठाकरे साहेब हे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार असून सदर परंपरा ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून सुरू केली होती.
सदर दसरा मेळाव्याकरिता धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जाणार असून अशा तमाम बाळासाहेब प्रेमी शिवसैनिकांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव यांच्या वतीने स्पेशल तुळजाभवानी एक्सप्रेस रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रेल्वे ही धाराशिव रेल्वे स्थानकावरून दिनांक 23/10/2023 रोजी सायं. 10.30 वा. मुंबईकडे रवाना होईल . तत्पूर्वी शिवसैनिकांच्या जेवणाची व्यवस्था सदर रेल्वेमध्ये करण्यात आलेली आहे.
उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, वाशी, तसेच औसा व निलंगा तालुक्यातील शिवसैनिकांनी धाराशिव स्थानकावरुन रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करावयाचे आहे. तसेच बार्शी,भूम,परंडा या तालुक्यातील शिवसैनिकांनी बार्शी स्थानकावरून सदर मेळाव्याकरिता जाण्यासाठी रात्री 11.00 वा. हजर राहावयाचे आहे. तसेच जे इतर शिवसैनिक आहेत त्यांना पुणे येथे दि. 24/10/2023 रोजी रात्री 2.00 वा स्पेशल रेल्वेने मुंबईकडे रवाना होता येणार आहे.
दि. 24/10/2023 रोजी सायं. 11.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनल येथून दादर-कल्याण-पुणे-बार्शी-धाराशिव येथे दि. 25/10/2023 रोजी सकाळी 10.00 वा पोहचेल. या रेल्वे प्रवासामध्ये जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच जिल्हाप्रमुख तथा धाराशिव-कळंबचे आमदार कैलास घाडगे-पाटील हे स्वतः प्रवास करणार आहेत.