मुरुम: मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणेगुर गावाजवळ एनएच 65 रोडवरून 20 म्हशींची बेकायदेशीर वाहतूक करताना दोघांना अटक करण्यात आली आहे.
दिनांक 09 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजता आयशर टॅम्पो (क्र. के ए 28 एए 9940) मध्ये 20 म्हशी दाटीवाटीने भरून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टॅम्पो थांबवला असता त्यामध्ये म्हशींना क्रूरपणे बांधले असल्याचे आढळून आले. त्यांच्यासाठी चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.
याप्रकरणी चॉदपाशा हणमंत गिरमला घाडगे (वय 35, रा. देवशर, जि. विजापूर) आणि बंदेनवाज अब्दुल रज्जाक मुजावर (वय 24, रा. बनतनाळ, जि. विजापूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याविरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हशींची किंमत अंदाजे 9 लाख 10 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.