नळदुर्ग – स्टेटसवर फोटो ठेवल्याच्या कारणावरून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अणदुर येथे घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन सिताराम देवकर (वय 45 वर्षे, रा. देशमुख वस्ती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी साजन भिम देवकर, सुरज भिम देवकर, हाणुमंत शिन्नु देवकर आणि विजय हणुमंत देवकर (सर्व रा. देशमुख वस्ती, अणदुर) यांनी 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी, लोखंडी कोयत्याने, काठीने आणि दगडाने देवकर यांना जखमी केले. तसेच, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर अर्जुन देवकर यांनी 10 फेब्रुवारी रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा. न्या. सं. कलम 333, 118 (2), 352, 351 (2), (3), 355 आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.