धाराशिव – धाराशिव शहरातील बौध्दनगर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका युवकावर ब्लेडने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी कल्पक शिंदे याच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभय बापू लोंढे (वय २२, रा. बौध्दनगर, धाराशिव) यांच्यावर दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० च्या सुमारास आरोपी कल्पक शिंदे याने जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, ब्लेडने वार करत त्यांना जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अभय लोंढे यांनी १० फेब्रुवारी रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 115(2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
धाराशिव शहरात मारामारी, तीन जणांवर गुन्हा दाखल
धाराशिव: शहरातील आण्णाभाऊ साठे नगर येथे 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हमीद शेख (रा. आण्णाभाऊ साठे नगर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, ओम मिसाळ, धनंजय मिसाळ आणि आण्णा मिसाळ (सर्व रा. आण्णाभाऊ साठे नगर) यांनी त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली, ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
या मारामारीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.वि. कलम 325, 323, 504, 506 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.