• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सुपरफास्ट युगातही कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम

नळदुर्ग आणि अणदूरची पौराणिक सांगड

admin by admin
August 10, 2024
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
सुपरफास्ट युगातही कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

अणदूर – तुळजापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री खंडोबा येथे श्रावण महिन्यात नळदुर्गच्या नागझरी झऱ्याच्या पाण्याने अभिषेक करण्याची अनोखी परंपरा जपली जाते. ही परंपरा आजच्या सुपरफास्ट युगातही कायम आहे, जिथे नागझरीचे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीद्वारे आणले जाते. यंदाचा मान पुजारी रोहित बाळू मोकाशे आणि शुभम महेश मोकाशे यांना देण्यात आला आहे.

नळदुर्ग आणि अणदूरची पौराणिक सांगड

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात राहणाऱ्या राजा नळ आणि राणी दमयंतीच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री खंडोबा आदीमैलारहून नळदुर्गात प्रकट झाले. त्यांनी दमयंतीच्या भक्तीसाठी बाणाईस चंदनपुरीहून नळदुर्गात आणून तिच्याशी विवाह केला आणि नंतर जेजुरीस प्रस्थान केले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. नंतर नळ राजाने नळदुर्गजवळील बोरी नदीजवळ मंदिर बांधून श्री खंडोबाच्या स्वयंभू मुर्तीची प्रतिष्ठापना केली. ही स्वयंभू मुर्ती नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरूजाजवळ सापडली होती.

कालांतराने श्री खंडोबाचे मंदिर अणदूर येथे बांधण्यात आले. त्यानंतर अणदूर आणि नळदुर्गच्या ग्रामस्थांमध्ये करार होऊन श्री खंडोबाची मुर्ती ने-आण करण्याचा निर्णय झाला. श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग जवळील बाणाई विवाह स्थळ मैलारपूर येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे असून, देव मात्र एकच आहे.

नागझरीची आगळीवेगळी प्रथा

श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार मानला जातो आणि त्यांच्या मुर्तीखाली महादेवाची पिंड आहे. श्रावण महिन्यात या पिंडीस आणि श्री खंडोबाच्या मुर्तीस नागझरीच्या पाण्याने अभिषेक करण्याची प्रथा आहे. नागझरी हा झरा बाणाई विवाह स्थळ मैलारपूर मंदिराजवळ डोंगरावर आहे. तेथून हे पाणी दोन पुजाऱ्यांच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीद्वारे भल्या पहाटे आणले जाते.

नागझरीचे स्थान

बाणाई विवाह स्थळ मैलारपूर मंदिरापासून वसंतनगर जाणाऱ्या रस्त्यावर कॅनॉलच्या दक्षिण बाजूस उंच डोंगरावर नागझरी झरा आहे. या ठिकाणी एक कुंड आहे. या झऱ्याचे पाणी बारा महिने वाहते आणि विशेष म्हणजे ते गरम असते. मागील काही वर्षे दुष्काळ असतानाही या झऱ्याचे पाणी वाहत होते. हे पाणी अत्यंत शुद्ध आणि निर्मळ असून, ते गंगेचे पाणी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

कावडीचा दिनक्रम

यंदाचा मान रोहित बाळू मोकाशे आणि शुभम महेश मोकाशे यांना देण्यात आला आहे. हे दोघे पहाटे तीन वाजता उठून अंघोळ करतात, धोतर नेसतात आणि प्रत्येकी दोन घागरी (सोबत कावड) घेऊन अनवाणी पायी चालत निघतात. ते पहाटे चार वाजेपर्यंत नागझरीला पोहोचतात. तेथे गेल्यानंतर परत अंघोळ करून प्रत्येकी दोन घागरी भरून कावडीने बाणाई विवाह स्थळ मैलारपूर मंदिरात जातात. तेथील मंदिरातील महादेवाच्या पिंडीस एका घागरीतील पाणी घालून, ते नदीकाठी असलेल्या म्हसोबाला पाणी घालतात आणि नदीतील एक घागर घेऊन थेट अणदूरकडे प्रस्थान करतात. बाणाई विवाह स्थळ मैलारपूरच्या मंदिरातून एकदा कावड उचलली की ती वाटेत कुठेही टेकावयाची नाही, असा नियम आहे. अणदूरच्या मंदिरात पहाटे साडेपाच ते सहा वाजेपर्यंत ते पायी चालत पोहोचतात.

मैलारपूर ते अणदूर हे अंतर चार किलोमीटर आहे. अंधाऱ्या रात्री पावसाची तमा न बाळगता ही कावड आणली जाते. जाण्या-येण्याचे अंतर हे ९ किलोमीटर आहे. हे जिकरीचे काम रोहित बाळू मोकाशे आणि शुभम महेश मोकाशे पार पाडत आहेत. कावडीने पाणी आणणे ही देवाची सेवा असून, ही सेवा करण्यात कसलेही कष्ट जाणवत नसल्याचे ते सांगतात.

अणदूरच्या श्री खंडोबाची पूजा आणि खडी रविवार

अणदूरच्या श्री खंडोबाची सकाळी ८ वाजता आणि रात्री ८ वाजता महापूजा होते. या दोन्ही वेळेस श्रावण महिन्यात श्री खंडोबाच्या मुर्तीस नागझरी झऱ्याच्या पाण्याने अभिषेक केला जातो. इतर महिन्यांतही दोन वेळेस नित्यनियमाने पूजा होते.

श्रावण महिन्यात सर्व ठिकाणी सोमवारी उपवास केला जातो, परंतु अणदूरमध्ये रविवारी उपवास केला जातो आणि तो खडी उभा राहून केला जातो. श्री खंडोबाची सकाळी ९ वाजता पूजा आटोपली की, उपवास करणारे उभे राहतात, ते दिवसभर जेवण करत नाहीत, उभे राहूनच फराळ करतात. नंतर रात्रीची पूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा संपल्यानंतर बसतात. तब्बल बारा तास उभे राहून हा उपवास केला जातो. यास खडी रविवार म्हटले जाते. त्याचबरोबर रात्रीच्या पूजेच्या वेळी पुजारी समाजातील प्रत्येक घरातून एका व्यक्तीने सोवळ्यामध्ये येऊन श्री खंडोबास पूजेच्या वेळी १०१ बेलपत्र घालण्याची प्रथा आहे. ही प्रथा आजही कायम आहे.

अनादी काळापासूनची प्रथा

अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी कावडीने आणण्याची प्रथा अनादी काळापासून सुरू आहे. ही प्रथा सध्याच्या सुपरफास्ट युगातही कायम ठेवण्यात आली आहे, असे मंदिर ट्रस्टचे सचिव सुनील ढेपे यांनी सांगितले.

Previous Post

डिग्गीत अवैध दारू जप्त, दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

Next Post

धाराशिव: ऑनलाईन रोजगाराच्या आमिषाने तरुणाची 18 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव: ऑनलाईन रोजगाराच्या आमिषाने तरुणाची 18 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!