नळदुर्ग : घराची चावी दिली नाही म्हणून रागाच्या भरात चुलतीला लाथाबुक्यांनी मारहाण करुन विहीरीत ढकलुन देवून ठार मारणाऱ्या अणदूर एका तरुणाविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-शब्बीर दस्तगीर पिंजारी रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्यांची चुलती मयत नामे- जैनाबी कासीम पिंजारी रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना घराची चावी मागीतली असता जैनाबी यांनी चावी खाली का टाकुन दिली या कारणावरून नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून दि. 30.12.2023 रोजी 17.30 वा. सु. ओढत नेहुन पाण्याने भरलेल्या दशरथ घुगे यांचे अणदुर शिवारातील जमीन गट नं 06/02 मधील विहीरीत ढकलुन देवून जिवे ठार मारले आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मस्तान ईसाक शेख, वय 36 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 302, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.