धाराशिव शहरातील बस स्थानकावर चोरांचा सुळसुळाट झाला आहे.एका महिलेचे मंगळसूत्र तर दुसऱ्या महिलेची पर्स लंपास करण्यात आली आहे. बस स्थानकाचे सध्या पाडकाम सुरु असून, पत्राच्या शेड्समध्ये तात्पुरता निवारा करण्यात आला आहे. याठिकाणी प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे महिलांच्या अंगावरील दागिने, पर्स लंपास करून हात साफ करत आहेत. एकीकडे चोरांचा सुळसुळाट झाला असताना, आनंदनगर पोलीस मात्र झोपा काढत आहेत.
फिर्यादी नामे-मोहीनी श्रीधरराव शिरुरे, वय 35 वर्षे, रा. अंबीका नगर लातुर ता. जि. लातुर या धाराशिव बसस्थानक येथुन लातुर येथे जाण्यासाठी उभा असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून मोहीनी शिरुरे यांचे गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 45,000 ₹ किंमतीचे हे दि. 30.12.2023 रोजी 12.15 वा. सु. चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मोहीनी शिरुरे यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी नामे-अनुराधा महादेव कोकाटे, वय 40 वर्षे, रा. साळुंकेनगर बेंबळी रोड धाराशिव ता. जि. धाराशिव या धाराशिव बस्थानक येथे लातुर बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून अनुराधा कोकाटे यांचे पर्समधील रोख रक्कम 17,000₹ हे दि. 29.12.2023 रोजी 13.00 वा. सु. चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनुराधा कोकाटे यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी नामे-सुनंदा पंडीत कदम, वय 50 वर्षे, रा. पिंपळा खुर्द, ता. तुळजापूर जि. धाराशिव या नविन बस्थानक तुळजापूर येथे तुळजापूर ते खडकी बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून सुनंदा कदम यांचे गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 40,000₹ किंमतीचे दि. 15.12.2023 रोजी 16.15 वा. सु. चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनंदा कदम यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी नामे-सच्चिदानंद कल्याणराव आवटे, वय 36 वर्षे, रा. वडगाव ता. गेवराई जि. बीड हे त्यांची मिनी बस मध्ये प्रवाशी भरुन अक्कलकोट ते बीड असे जात आसताना दि. 13.12.2023 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. तेरखेडा येथील आरुष बिअरबार ते तेरखेडा पासुन अंदाजे 2 किलोमिटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाचे दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिनी बसच्या टपावर चढून 8 प्रवासी बॅगमध्ये 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 50,000₹ व कपडे असा एकुण अंदाजे 89,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सच्चिदानंद आवटे यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.