ढोकी :आरोपी नामे- 1)विलास नाना चव्हाण, 2)सिताबाई छगन शिंदे, 3) रेखा विलास चव्हाण 4)अनिल छाया काळे, 5) बालाजी विलास चव्हाण, 6) सुनिल लाला काळे, 7) अजित दादा शिंदे, 8) छामा काळे, 9) शंकर छमा काळे, 10) अनिल छमा काळे, 11) सुनिल कल्याण शिंदे, 12) देवराव शिंदे, 13) ओम विलास चव्हाण, सर्व रा. ढोकी ता. जि. धाराशिव, 14) रमेश भालचंद्र शिंदे रा. वाखरवाडी ता. जि. धाराशिव व इतर आठ ते दहा इसम यांनी दि.29.12.2023 रोजी 22.00 वा .सु. पेट्रोलपंप ढोकी येथे फिर्यादी नामे-दिपक रविंद्र सुपलकर, वय 20 वर्षे, रा. पेट्रोल पंप चौक ढोकी ता. जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी नांदेड येथील एका मुलास पारध्याची मुले मारहाण करत होती म्हणून फिर्यादी व फिर्यादीचे वडील रविंद्र सुपलकर, भाउ ज्ञानेश्वर राजु सुपलकर, ईश्वर राजु सुपलकर हे भांडण सोडवत असताना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्यांचे वडील यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड, उस, काठी, विटा व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिपक सुपलकर यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 307, 126, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा :आरोपी नामे- 1) बाबु राठोड, 2) राहुल राठोड, 3) सचिन राठोड रा. आनंदनगर तांडा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 13.15 वा. सु. लोहारा खु. येथुन लोकमंगल साखर कारखाना समोरील हॉटेलवर फिर्यादी नामे-रावन देविदास रसाळ, वय 35 वर्षे, रा. लोहारा खु ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन तु आमचे दारुच्या धंद्याची माहिती का देतो या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचे दांड्याने, मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रावन रसाळ यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे- 1)आनंत उत्तम घुमरे, 2) आत्माराम उत्तम घुमरे, 3) निर्मला आनंत घुमरे, 4) शितल आत्माराम घुमरे, सर्व रा. आंदोरा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 29.12.2023 रोजी 21.00 वा. सु. आंदोरा शिवार येथे फिर्यादी नामे- शहाजी काशिनाथ घुमरे, वय 55 वर्षे रा. आंदोरा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी आयोध्या घुमरे या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शहाजी घुमरे यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.