नळदुर्ग – सोलापूर – उमरगा हमरस्त्यावरील अणदूर ते जळकोट हा १० किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहे. दररोज किमान एक तरी अपघात या रस्त्यावर घडतो आणि गेल्या दहा वर्षांत यातून पाचशेहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे या रस्त्याला ‘यमचा रस्ता’ असे नाव पडले आहे.
या रस्त्यावरील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी नळदुर्ग बायपास रस्ता तातडीने सुरू करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नळदुर्ग बायपास आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या या बायपासवरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
नळदुर्ग बायपास सुरू झाल्याने नळदुर्ग शहरातून जाणारी वाहतूक कमी होईल आणि अपघातांचे प्रमाणही घटेल अशी अपेक्षा आहे. यामुळे नळदुर्ग शहरालाही मोकळा श्वास मिळणार आहे.
दरम्यान, सोलापूर – उमरगा हमरस्त्यावरील अपघातांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव लाइव्हने सातत्याने आवाज उठवला होता.