ईटकळ गावातील तलाठी मॅडम हर्षा अंकुशे-लोहार यांच्या कामाच्या पद्धतीने गावकऱ्यांचे मनोरंजन आणि संताप यांचा मेळ साधला आहे. ईटकळ हे मोठे गाव असूनही मॅडम तिथे काम करायला तयार नाहीत; उलट त्यांनी तुळजापूरमध्ये ‘पुजारी मंडळाच्या पाठीमागे खासगी ऑफिस’ थाटले आहे. त्यांच्या या नव्या कार्यशैलीमुळे गावकऱ्यांना ४० किलोमीटरचा प्रवास करून तुळजापूर गाठावं लागत आहे.
गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला. त्यांनी मॅडमवर प्रश्नांचा भडिमार केला, पण तलाठी मॅडम त्यावर अविचल! त्यात कोतवाल साहेब देखील गेली दोन वर्षं ‘गायब पोस्ट’ आहेत. कोतवाल दिसेल की नाही, हेच गावकऱ्यांना सस्पेन्स झाला आहे.
गावकऱ्यांच्या मते, ईटकळमध्ये शेतीच्या कामांसाठी तलाठीची गरज असते, पण मॅडम तिथे न येता तुळजापूरमधूनच कारभार हाकतात. सरकारी भत्ते, घरभत्ता, आणि गावातील गरजा या सगळ्यावर मॅडमने ‘ड्युटी वरून सुट्टी’ घेतल्याचं स्पष्ट आहे.
गावकऱ्यांना आता पुढील प्रश्न पडला आहे – कोतवाल भेटण्याचा शोध मोहीम सुरू करावी की तलाठी मॅडमना त्यांच्या मूळ पोस्टवर पोहोचवण्यासाठी मोर्चा काढावा? एकूणच, ईटकळ गावाचा सरकारी कारभार ‘भुतांच्या गोष्टींपेक्षा रंजक’ वाटतोय!
व्हिडीओ पाहा