• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर तालुक्यात ज्येष्ठ दाम्पत्याला लोखंडी रॉड अन् सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण; ६ जणांवर अट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

admin by admin
June 11, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी – लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या आणि सिमेंटच्या गट्टूने ज्येष्ठ दाम्पत्याला बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार खडकवस्ती (ता. तुळजापूर) येथे घडला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून ही मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध अट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिश शरद काळे, पंडित मेनकुदळे, शिवलिंगवा मेनकुदळे, शहाजी शिंदे, शालन शिंदे आणि सुरज शिंदे (सर्व रा. खडकवस्ती, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शरद झुंबर काळे (वय ६०, रा. खडकवस्ती) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

लोखंडी रॉड, सिमेंटच्या गट्टूने हल्ला

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास खडकवस्ती येथे ही घटना घडली. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून किरकोळ कारणावरून फिर्यादी शरद काळे आणि त्यांच्या पत्नी चित्रा काळे यांना गाठले. आरोपींनी या दाम्पत्याला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर संशयितांनी हातातील लोखंडी रॉड, लाठी आणि सिमेंटच्या गट्टूने शरद काळे व त्यांच्या पत्नीवर जबर प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात हे ज्येष्ठ दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. मारहाण केल्यानंतर ‘तुम्हाला जिवे ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी दिली.

तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर पीडित शरद काळे यांनी १० जून रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित ६ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८App(२), १९१(२), १९१(३), १९० सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (अट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.

Previous Post

‘माझा संसार का मोडलास?’ म्हणत जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला; लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील घटना

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! केबल, दुचाकीसह ३ लाखांची ॲल्युमिनियम तार लंपास; चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! केबल, दुचाकीसह ३ लाखांची ॲल्युमिनियम तार लंपास; चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026

Recent Posts

  • ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत
  • फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!
  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!