नळदुर्ग :आरेापी नामे- 1) निलकंठ इंद्रजित भालेराव,2) इंद्रजित अनिल भालेराव, 3)भारत निलकंठ भालेराव, सर्व रा. निलेगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.10.2023 रोजी 18.00 वा. सु. निलेगाव येथे फिर्यादी नामे- केराबाई शिवाजी भालेराव, वय 50 वर्षे, रा. निलेगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना त्यांचे घराचे पाठीमागील जागेत शेड मारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडा पाराने मारहाण करुन जखमी केले. तुझे हात पाय तोडतो असे म्हणुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या केराबाई भालेराव यांनी दि.22.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरेापी नामे- 1) विजय माणिक जाधव,2) ज्ञानेश्वर माणिक जाधव, 3)अनिता माणिक जाधव,4) विशाल संजय जाधव अनोळखी चार सर्व जहागीरदारवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.20.10.2023 रोजी 21.00 वा. सु. जहागीरदारवाडी येथे फिर्यादी नामे- दिनेश बाळु जाधव, वय 33 वर्षे, रा. जहागीरदारवाडी ता. जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडा सळईने, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे पत्नी सुरेखा, मुलगी अक्षरा, मुलगा अदित्य व आई शालुबाई यांना मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिनेश जाधव यांनी दि.22.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरेापी नामे- 1) अभिजीत गोरे, रा. वेताळ नगर तुळजापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.10.2023 रोजी 18.00 वा. सु. विश्वनाथ कॉर्नर तुळजापूर येथे फिर्यादी नामे- शशिकांत दत्ता माने वय 27 वर्षे, रा. शिराढोण, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,पत्तीने(ब्लेड) हाताचे मनगटावर वार करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शशिंकात माने यांनी दि.22.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.