मुरुम :आरोपी नामे-1) सुनिल राठोड, 2)संदीप राठोड दोघे रा. नाईकनगर मु. ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.21.10.2023 रोजी 21.55 वा. सु. नाईकनगर मु. येथे भाडंण चालु असल्याचा पोलीस नियंत्रण कक्ष धाराशिव येथुन फिर्यादी नामे- श्रीहरी नरसिंग फुगटे, वय 37 वर्षे पोलीस अंमलदार 1121 ने पो ठाणे मुरुम यांना फोन आल्याने फिर्यादी हे सदर ठिकाणी जावून त्यांचे शासकिय काम पार पाडत असताना नमुद आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादीस म्हणाले की, आम्ही संदीप राठोड यांचा मर्डर करणार आहे तुम्ही त्याला घेवून जावू नका तुम्ही संदीपला घेवून गेले तर तुमचाही मर्डर करीन अशी धमकी दिली. व शासकीय कामात अडथळा निर्माण करुन फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून लाथाबुक्यांनी मारहाण केली व शासकिय काम पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन श्रीहरी फुगटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 332, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
कळंब : आरोपी नामे-श्रीशैल मधुकर चव्हाण, वय 30, वर्षे, 2) मरुबाई राजू गायकवाड, वय 65 वर्षे, 3) राजेश उर्फ राजू नवनाथ चव्हाण, वय 35 वर्षे, रा गैबी पीरनगर रामवाडी सोलापूर जि. सोलापूर यांनी दि. 13.10.2023 रोजी 14.00 ते दि.21.10.2023 रोजी 13.30 वा.सु. बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा कळंब येथे नमुद आरोपी यांनी संगणमत करुन मयत हरीश्चंद्र मारुती जगताप रा. डिकसळ यांचे सेव्हिंग खाते नं 60225888505 मधुन 70,000₹ व मयत शांताबाई निवृत्ती धस यांचे सेव्हिंग खाते नं 20260104336 मधुन 20,000₹ असे एकुण 90,000₹ खोटे आधारकार्ड व पासबुक दाखवून बॅकेचे अकाउंट वरुन पैसे काढून बॅकेची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी मानवेंद्र मधुकर पटेल, वय 31 वर्षे, शाखाधिकारी बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा कळंब रा. आल्हा चौक महोबा ता. जि. महोबा उत्तरप्रदेश ह.मु. मुंडे गल्ली कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.22.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420465, 468, 470, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.