तुळजापूर : फिर्यादी नामे-उदयश्री आरविंदकुमार कट्टीमणी, वय 25 वर्षे, रा. कलबुर्गी, कर्नाटक यांचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याची साखळी अंदाजे 50,000₹ किंमतीची ही दि. 15.10.2023 रोजी 00.30वा. सु. तुळजाभवानी मंदीराचे पेड दर्शन पास रांगेजवळ तुळजापुर येथुन अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी-उदयश्री आरविंदकुमार कट्टीमणी यांनी दि.22.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-दि. 22.10.2023 रोजी 01.00 ते 09.00 वा. सु. हंगरगा रोपवाटीका तुळजापूर येथील पत्रयाचे शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन होंडा कंपनीचे 3 एच पी इंजन अंदाजे 8,000₹, रेयली कंपनीचा फवारणी पंप डबल बॅटरी अंदाजे 2,000₹, थ्रि फेज वायर 100 फुट, एक इंची गार्डन पाईप 100 फुट असा एकुण 12,600₹ किंमतीचा माल चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी-शहाजी भारत देशमुख, वय 38 वर्षे, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालय तुळजापूर रा. सारागौरव तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे-प्रदिप भालचंद्र यादव, वय 44 वर्षे, रा. उमरेकोटा धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे ताकविकी शिवारातील शेत गट नं 284 येथील पाण्याचे होंडा कंपनीचे इंजन,चार्जिंग बॅटरी, पानबुडी मोटर व स्टार्टर असे एकुण 27,200₹ किंमतीचे साहित्य हे दि. 21.10.2023 रोजी 09.00 ते 11.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी-प्रदीप यादव यांनी दि.22.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 461 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.