नळदुर्ग – छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद महामार्गावर हागलुर पाटीजवळ आज (30 जानेवारी) दुपारी 12.50 वाजता मोटरसायकल आणि स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन युवक जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती:
नळदुर्गहून तुळजापूरकडे जाणारी मोटरसायकल (क्रमांक MH.25.AX.1527) आणि तुळजापूरहून नळदुर्गकडे येणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH.44.B.2443) यांच्यात हा अपघात झाला. अचानक कारचा तोल गेल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमी व्यक्ती:
- ओम राजेंद्र दासकर (वय 19, रा. नळदुर्ग)
- आनंद प्रकाश सालगे (वय 15, रा. खुदावाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज धाम यांच्या मोफत रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पुढील तपास संबंधित पोलिस करत आहेत.