नळदुर्ग: नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरळी बु. येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद बालाजी डोंगरे (वय 30, रा. आरळी बु.) असे आरोपीचे नाव आहे. ७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी उकरंडे यांच्या किराणा दुकानाजवळ डोंगरे यांनी केसर युक्त पान मसाला आणि व्हि १ तंबाखु कंपनीचे १००-१०० पुडे असा १५ हजार रुपये किमतीचा गुटखा बाळगल्याचे पोलिसांना आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम २७५, २२३ सह ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.