नळदुर्ग: निलेगाव येथे एका व्यक्तीची नैसर्गिक विधीसाठी गेले असताना स्कूटीसह मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सुधाकर भाउराव कांबळे (वय ३५, रा. दहिटणे, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निलेगाव येथील सातबारा हॉटेलच्या बाजूला नैसर्गिक विधीसाठी गेले होते.
त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची ८०,००० रुपये किमतीची स्कूटी (क्र. एमएच १३ ईजी ९९०५) आणि डिग्गीमधील सॅमसंग कंपनीचा मोबाइल चोरून नेला. कांबळे यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध सुरू आहे.