पक्या: (हसत) ये भावा, सज्जन पाटलांचं नवीन राजकीय गणित बघितलं का ?
भावड्या: हो रे पक्या, ते एकदम ‘पक्ष-यात्रा’ करतायत! राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, आणि पुन्हा शिवसेना! खरंच आश्चर्य वाटतंय!
पक्या: भावड्या , आता त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलाय . ते पण एका कारणांसाठी …
भावड्या: त्याच कारणासाठी त्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा आशीर्वाद घ्यायचा होता ना?
पक्या: हो, हो! तसंच, बळकावलेल्या ‘भोसले हायस्कूल’ चे ते कार्याध्यक्ष आहेत ना! मग त्यांचा ‘मैदानाचा’ प्रेम बघ ना! मोठं मैदान मिळालं, तर त्यावर अनधिकृत बिल्डिंग बांधली!
भावड्या: (हसत) आणि हां, पुतळा पण उभारला म्हणे! लोक म्हणतायत की भाजप मध्ये कुणीच दाद देईना म्हणून त्यांनी ते वाचवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला!
पक्या: अहो, त्यांच्या यशाची हीच तर खुबी आहे! राजकारणात प्रवेश करून काय वाचवायचं ते वाचवायचं!
भावड्या: खरंच, आपलं गाव सज्जन पाटील यांच्या प्रत्येक नवीन ‘वळणावर’ चर्चेत असतं!
पक्या: (हसत) अरे, त्या ‘धाराशिव’च्या शिक्षण सम्राटांचं काही खरं नाही! उद्या कधी इकडून तिकडे जातील, कळतच नाही!
भावड्या – विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून शिंदे सेनेत गेले कि. शिक्षणाचं साम्राज्य वाचण्यासाठी गेले म्हणायचे ?
पक्या – ते अनिल भाऊच नक्की सांगतील…
भावड्या: (हसत) आणि आमचं मनोरंजन त्यामुळं सुरुच राहील! चला, पुढचं काय होणार बघू!