उमरगा : मुलगा होत नाही म्हणून सासऱ्याने सुनेचा धारधार शस्त्राने मारहाण करुन खून केला आणि पोलीस अटक करतील या भीतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उमरगा येथे घडली.
आरोपी नामे-सुरेश शंकर दुधभाते, वय 75 वर्षे, रा. जखनी वस्ती ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 01.06.2024 रोजी 13.00 ते 13.30 वा. सु. मुळज शिवारातील शेतात लिंबोणीच्या झाडाखाली मयत नामे- ललिता माधव दुधभाते, वय 38 वर्षे, रा. मुळज जखनी वस्ती ता. उमरगा जि. धाराशिव यांना मुलगा होत नाही या करणावरुन धारधार शस्त्राने मारहाण करुन जिवे ठार मारले. व आरोपी नामे सुरेश दुधभाते यांनी राहते घरात जवून आडूला गळफास घेतला. अशा मजकुराच्या ज्योती दगडु कांबळे, वय 21 वर्षे, रा. कोपरे कॉलनी औसा ता.औसा जि. लातुर यांनी दि.02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मयत आरोपी सुरेश दुधभाते यांना एकुलता एक माधव नावाचा होता. माधव यास तीन मुली होत्या.विशेष म्हणजे तिन्ही मुलीची लग्ने झाली आहेत. वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा होण्यासाठी सुरेश हा माधवला दुसरे लग्न कर म्हणून तगादा लावत होता, त्यास माधवची पत्नी ललिता विरोध करत होती. त्यातूनच आरोपी सासरा सुरेश दुधभाते याने सून ललिता हीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
धाराशिव : आरोपी नामे- कृष्णा वाघमारे, ज्ञानेश्वर गळकटे, कृष्णा सुतार, सर्व रा. शाहुराज चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 31.05.2024 रोजी 21.00 वा. सु. संभाजी चौक शाहुनगर चौक येथे फिर्यादी नामे-गणेश रामलिंग शिराळे, वय 24 वर्षे, रा. शेकापुर ता. जि. धाराशिव यांना मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश शिराळे यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : आरोपी नामे- दस्तगीर गयास जहागीरदार, आसीम गयास जहागीरदार दोघे रा. हत्ती गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 29.05.2024वा.सु. नानीमा दर्गा समोरील रोडवर नळदुर्ग येथे फुरखान अली शब्बीर अली शेख, वय 36 वर्षे रा. इनामदार गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने माराहण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व फिर्याचा मोबाईल फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फुरखान अली शेख यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 427, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.