उमरगा : आरोपी नामे-विजय शिवाजी सुरवसे, रा. बोळेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव व सोबत मयत नामे- नारायण आंबादास हाळनुरे, रा. बोळेगाव ह. मु. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.30.11.2023 रोजी 18.00 वा. सु. लक्ष्मी पाटीच्या पुढे एकुरगा पाटीजवळ आरोपी नामे- विजय सुरवसे यांच्या पिकअप क्र एमएच 25 एजे 1933 यामध्ये प्रवास करत होते. दरम्यान विजय सुरवसे यांनी त्याचे ताब्यातील पिकअप हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे रोडवरील खंड्ड्यांकडे दुर्लक्ष करुन वेडेवाकडे चालवल्यामुळे यातील मयत नामे नारायण हाळनुरे हे पिकअप मधून खाली पडून गंभीर जखमी होवुन जागीच मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- सुमित्रा नारायण हाळनुरे, वय 39 वर्षे, बोळेगाव ह. मु. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.05.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : मयत नामे-मारुती संतराम डोंगरे, वय 72 वर्षे रा. मानधने पेट्रोलपंपासमोर कळंब जि. धाराशिव हे दि.01.12.2023 रोजी 09.30 वा. सु. जयमल्हार हॉटेल समोर कळंब येथुन पायी जात होते. दरम्यान टाटा विस्टा गाडी क्र एमएच 25 आर 3810 च्या चालकाने त्याचे ताब्यातील टाटा विस्टा कार ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून मयत नामे- मारुती डोंगरे यांना पाटीमागून धडक दिली. या अपघातात मारुती डोंगरे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जयश्री दादाराव कांबळे, वय 47 वर्षे, रा. शिवाजी नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.05.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279 337, 338, 304 (अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
ढोकी :आरोपी नामे- 1) पृथ्वीराज काकासाहेब मोरे, 2) आकाश काकासाहेब मोरे हे दोघे रा. गोवर्धनवाडी ता.जि.धाराशिव यांनी दि. 04.12.2023 रोजी 16.00 वा. सु. हॉटेल गणेश च्या समोर गोवर्धनवाडी येथे फिर्यादी नामे-सौरभ हानुमंत वाघमोडे, वय 23 वर्षे, रा. गोवर्धनवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काठी व कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी- सौरभ वाघमोडे यांनी दि.05.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.