उमरगा : फिर्यादी नामे-मनोज दयानंद साळुंके, वय 23 वर्षे, व्यवसाय पेट्रोलपंप मॅनेजर रा. नागराळ, ता. उमरगा जि. धाराशिव हे मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या पेट्रोलपंप मालकाचा मुलगा नामे- विशाल विष्णु कल्याड्यु रा. 904 ओम साइ्र अपार्टमेंट, प्लॉट नं 23 सी, खारघर नवी मुंबई यांनी दि. 25.10.2023 रोजी 15.00 वा. सु. राधा हायवे सर्विसेस जकेकुर चौरस्ता येथील पेट्रोलपंपाचे पाठीमागील भिंतीवरुन उडी मारुन पेट्रोलपंपमध्ये येवून कॅशीअर रुममधील लॉकरमधील रोख 2,75,000 ₹ व बॅक ऑफ इंडीया शाखा उमरगाचा कोरा चेक चोरुन घेवून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनोज साळुंके यांनी दि.05.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे- शुभम किशोर कदम, वय 37 वर्षे, रा. अर्जुन नगर अमरावती हे व सोबत इतर 25 प्रवासी हे सोलापूर ते अमरावती वाहन क्र एमएच 14 सी. डब्ल्यु. 4482 मध्ये प्रवास करीत असताना दि. 29.09.2023 रोजी 22.00 ते दि. 30.09.2023 रोजी 04.00 वा. सु. येरमाळा ते वाशी प्रवासा दरम्यान अनोळखी तीन व्यक्तीने वाहानातील फिर्यादी सोबत असलेल्या विद्यार्थ्याच्या जुन्या वापरत्या बॅगा व त्यातील कपडे असा एकुण 40,000₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शुभम कदम यांनी दि.05.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल
मुरुम : आरोपी नामे-1) भिमाशंकर संगप्पा कलशेट्टी वय 24 वर्षे, बोरगाव ता. तुळजापूर, जि. धाराशिव 2) जुबेर इब्राहीम कुरेशी, वय 24 वर्षे, हंगरगा ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांनी दि.05.012.2023 रोजी 16.30 वा.सु. बेळंब ते कोथळी जाणारे आप्पासाहेब पाटील यांचे शेताजवळ अशोक लिलॅड टेंम्पो क्र एमएच 25 एजे 1415 वाहनामध्ये अंदाजे 27,000₹ किंमतीचे गाय व वासरे बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करताना मुरुम पो ठाणेच्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (1) (ड) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधि 1995 क 5(अ), 8(ई) कायदा कलम- 12 (B) (C),क.119 म.पो.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.