मुरुम : आरोपी नामे- पांडुरंग इराप्पा घोडके, वय 80 वर्षे, रा. बेळंब ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.06.01.2024 रोजी 11.00 वा. सु. बेंळब येथे केसरजवळगा जाणारे रोडचे थोडे पुडे हॉटेल गुडलक व बियर बार बाजूस मुरुम ते अक्कलकोट जाणारे रोडलगत वॉशरुमला जावून परत येत असताना मोटरसायकल क्र एमएच 13 एके 0315 चा चालक नामे नंदु मल्लु मंजेली, रा. अडव्यप्पा, हनुमान मंदीर जवळ 34/3/25, न्यु पाच्छा पेठ सोलापूर ता. जि. सोलापूर यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून पांडुरंग घोडके यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात पांडुरंग घोडके हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे-सिद्राम पांडुरंग घोडके, वय 48 वर्षे, रा. बेळंब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.13.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जुगार विरोधी कारवाई
वाशी : जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.13.01.2024 रोजी 13.50 वा. सु. वाशी पो. ठा. हद्दीत पिंपळगाव लिंगी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)रवि महेद्रं काडे, वय 29, रा. पिंपळगाव लिंगी ता. वाशी जि. धाराशिव हे 13.50 वा. सु. पिंपळगाव लिंगी येथे आपल्या पानटपरी मध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलीसांनी दि.13.01.2024 रोजी 17.30 वा. सु. धाराशिव ग्रामीण पो. ठा. हद्दीत येडशी शिवारातील मनोज प्रतापराव नलावडे यांचे शेतात छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आप्पा आनंदराव डोके, वय 40, 2) भागवत भाउ कचरे, वय 45 वर्ष्ज्ञे, 3) धनंजय बळीराम गरड, वय 45 वर्षे, 4) अशोक भागवत वाघमारे, वय 52 वर्षे, 5) बाळासाहेब विक्रम जगताप, वय 43 वर्षे सर्व रा. सातेफळ ता. कळंब जि. धाराशिव 6) बंटी उर्फ गोपाळ भिमराव खोबरे, वय 42 7) मनोज प्रतापराव नलावडे, वय 50 वर्षे, 8) शरद पांडुरंग कदम, वय 36 रा. आळणी, 9) लक्ष्मण रामलिंग आसतुरे, वय 48 रा. गौर ता. कळंब जि. धाराशिव हे सर्वजन 1730 वा. सु. येडशी शिवारातील मनोज प्रतापराव नलावडे यांचे शेतात तिरट मटका जुगाराचे साहित्यासह 4 मोटरसायकल असा एकुण 1,89,410 ₹ साहित्य व रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.