धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील धाकट लोहारा येथे गावठी कट्ट्याने गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात नितीन आरगडे याचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी आहे.
आरोपी नामे-रावण देविदास रसाळा रा. लोहारा खुर्द ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.06.02.2025 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. शेतातील वड्याच्या काटाला लोहारा खुर्द येथे मयत नामे-नितीन मधुकर आरगडे, वय 30 वर्षे, रा. लोहारा खुर्द ता.लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडण तक्रारीचे दाखल गुन्ह्यात भांडणाची सोडवा सोडव केल्याचे कारणावरुन यास अवैध्य पिस्तुलने गोळ्या घालुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नचिकेत उर्फ खुडु मधुकर आरगडे, वय 32 वर्षे, रा. लोहारा खुर्द ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.06.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 103(1) सह 3 (25) शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.