परंडा : आरोपी नामे-1)बालाजी माधवराज पारसे रा. बोंन्ती ता. औराद जि. बिदर राज्य कर्नाटक ह.मु. मधुकर सुखदेव चौबे यांचे कांदलगांव शिवार शेत गट नं. 110 मधील पालावर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.01.2024 रोजी 04.00 वा. सु. मधुकर सुखदेव चौबे यांचे कांदलगाव शिवार शेत गट नं. 110 मधील विहीरीत मयत नामे- मिनाबाई बालाजी पारसे रा. बोंन्ती ता. औराद जि. बिदर राज्य कर्नाटक ह.मु. मधुकर सुखदेव चौबे यांचे कांदलगांव शिवार शेत गट नं. 110 मधील पालावर ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दारु पिवून लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व तुला आता जिवेच मारतो असे म्हणून मयत मिनाबाई पारसे हिस पोहता येत नसल्याचे नमुद आरोपीस माहित असतानाही तिला जाणून बुजून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहीरीत ढकलुन देवून तिला जिवे ठार मारले. अश्या मजकुराच्या मयताची बहिण फिर्यादी नामे- गोंडराज ज्ञानोबा टाळीकुटे, वय 25 वर्षे, रा. खेरडा, बु ता. औराद जि. बिदर राज्य कर्नाटक, ह.मु. मधुकर सुखदेव चौबे यांचे कांदलगांव शिवार शेत गट नं. 110 मधील पालावर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 302, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल
धाराशिव : मयत नामे-शिवम सतीष शिरसट, वय 18 वर्षे, रा. पळसवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.18.01.2024 रोजी सकाळी 10.00 वा. सु. त्यांचे राहात्या घरात स्लॅबचे हुकास हॉलमध्ये पळसपवाडी येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- बाळासाहेब मारुती कोळगे, 2) रोहित बाळासाहेब कोळगे, 3) नानासाहेब दत्तात्रय कोळगे, सर्व रा. पळसवाडी ता. जि. धाराशिव यांनी मयत शिवम शिरसट यास मागील केस मधील तुझे वडील, चुलते, भाउ, आई व नातेवाईक यांची जामीन रद्द करायला लावुन तुझे 18 वर्षे पुर्ण झाले आहे त्यामुळे तुला अटक करायला लावुन तुला जेलला टाकायला लावतो व तुझे करियर बरबाद करु अशी धमकी देवून शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून शिवम शिरसट यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराचा चुलता- शहाजी वंसत शिरसट, वय 48 वर्षे, रा. पळसवाडी ता. जि.धाराशिव यांनी दि. 19.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504,506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.