नळदुर्ग : मयत नामे- देवेंद्र इरणप्पा अरबळे, वय 48 वर्षे, रा. नांदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 15.01.2024 रोजी 17.00 वा. सु. नांदगाव शिवारातील शेत गट नं 155 मध्ये उसाच्या कांड्या गोळा करुन शेतात असलेल्या हार्वेस्टर समोर टाकत असताना मयताचे शेतात काम करणारे दुसरे इनपेटरला लोवलेले ट्रॅक्टर हेड वाहन क्र एमएच 13 डीवाय 7539 चा चालक नामे- तेजस रत्नाकर बनसोडे रा. सोलापूर यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर/ हेड हे हायगई व निष्काळजीपणे चालवून देवेद्र अरबळेयांना समोरुन धडक दिल्याने अपघात झाला.
या अपघातात देवेंद्र अरबळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद ट्रॅक्टर चालक हा अपघात करुन जखमीस उपचार कामी दवाखान्यात न नेहता तेथुन पळून गेला. अशा मजकुराच्या मयताचा भाउ फिर्यादी नामे- नागेंद्र इरणप्पा अरबळे, वय 50 वर्षे, रा. नांदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. व्यंकटेश नगर नळदुर्ग यांनी दि.19.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह मोवाका कलम 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल
धाराशिव : मयत नामे-शिवम सतीष शिरसट, वय 18 वर्षे, रा. पळसवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.18.01.2024 रोजी सकाळी 10.00 वा. सु. त्यांचे राहात्या घरात स्लॅबचे हुकास हॉलमध्ये पळसपवाडी येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- बाळासाहेब मारुती कोळगे, 2) रोहित बाळासाहेब कोळगे, 3) नानासाहेब दत्तात्रय कोळगे, सर्व रा. पळसवाडी ता. जि. धाराशिव यांनी मयत शिवम शिरसट यास मागील केस मधील तुझे वडील, चुलते, भाउ, आई व नातेवाईक यांची जामीन रद्द करायला लावुन तुझे 18 वर्षे पुर्ण झाले आहे त्यामुळे तुला अटक करायला लावुन तुला जेलला टाकायला लावतो व तुझे करियर बरबाद करु अशी धमकी देवून शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून शिवम शिरसट यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराचा चुलता- शहाजी वंसत शिरसट, वय 48 वर्षे, रा. पळसवाडी ता. जि.धाराशिव यांनी दि. 19.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504,506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.