परंडा : आरोपी नामे-इम्रान नसीर शेख, वय 29 वर्षे, रा. नियत मक्का मस्जीद, भाग्यवादीनगर कोंडवा पुणे ता. जि. पुणे हे दि.19.01.2024 रोजी 15.36 ते 19.30 वा. सु. परंडा ते देवगाव रोडवर खंडेश्वरी शाळेच्या समोर 8.33 ग्रॅम वजनाचे एम.डी. (मेफेडोन) अंमली पदार्थ अंदाजे 16,000 ₹ किंमतीचे, मोबाईल फोन, मारुती ब्रिझा कंपनीची कार क्र एमएच 46 ए.यु.2832 अंदाजे 4,00,000₹ किंमतीची असा एकुण 04,26,000₹ किंमतीचा माल हा विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगलेला परंडा पोलीस ठाण्याचे पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी अंमली पदार्थ जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 कलम- 8 (क), 22 (ब) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
चोरीचे दोन गुन्हे दाखल
उमरगा : फिर्यादी नामे- महेश बस्वराज हेबळे, वय 47 वर्षे, रा. मलंग प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 18.01.2024 रोजी 10.00 ते 16.00 वा. सु. तोडून आत प्रवेश कपाटाचे लॉकर तोडून कपाटामधील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 39 तोळ्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम 50,000₹ असा एकुण 1,27,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश हेबळे यांनी दि.19.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 454,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-रमेश विठ्ठल करवर, वय 31 वर्षे, रा. राघुचीवाडी ता. जि. धाराशिव यांचे राघुचीवाडी शिवारातील शेतात बांधलेल्या दोन म्हशी अंदाजे 80,000₹ किंमतीच्या या दि. 13.01.2024 रोजी 19.30 ते 21.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या आहे. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश करवर यांनी दि.19.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.