• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तांदुळवाडीत शेतकऱ्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार!

 हक्काचा मोबदला मागितला तर मिळाली लाठी, कंपनीच्या मुजोरीपुढे प्रशासन झुकले?

admin by admin
June 21, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
तांदुळवाडीत शेतकऱ्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : आपल्या हक्काच्या जमिनीचा योग्य मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछूट आणि अमानुष लाठीमार केल्याची संतापजनक घटना वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात घडली आहे. पवनचक्की कंपनीच्या इशाऱ्यावर पोलिसांनीच बळीराजावर लाठ्या उगारल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, ‘आमचा गुन्हा काय?’ असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी येथील शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या पवनचक्कीच्या विद्युत लाईनचे टॉवर जात आहेत. एका कंपनीने दिलेल्या दरानेच दुसऱ्या कंपनीनेही जमिनीचा मोबदला द्यावा, ही शेतकऱ्यांची रास्त मागणी होती. मात्र, संबंधित कंपनीने शेतकऱ्यांशी कोणताही संवाद न साधता थेट पोलीस बळाचा वापर करत दडपशाहीचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळत नसल्याने शांततेत काम थांबवले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी कोणताही सारासार विचार न करता, थेट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस शेतकऱ्यांवर निर्दयीपणे लाठ्या चालवताना दिसत आहेत. या अमानुष मारहाणीत काही शेतकरी जखमी झाले आहेत.

या संतापजनक प्रकारानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. अन्नदात्यावरच पोलिसांनी लाठी उचलल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, दोषी कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कंपनीच्या नफेखोरीसाठी प्रशासन शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपी विनोद गंगणेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला

Next Post

कळंब तालुक्यातील निसर्ग लॉजवर पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंब तालुक्यातील निसर्ग लॉजवर पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!