ढोकी – ढोकी गावात ग्रामपंचायत समोर दोन गटात झालेल्या परस्पर मारहाणीच्या घटनेत दोघांवरही गुन्हे दाखल झाल्याची घटना घडली आहे.दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.४५ वाजता ग्रामपंचायत समोर राजकिरण प्रकाश ढवारे (वय ४२ वर्षे, रा. भिमनगर, ढोकी) आणि महादेव नारायण सुपलकर (वय ३६ वर्षे, रा. तळगल्ली, ढोकी) यांच्यात वाद झाला. या वादातून दोघांनीही एकमेकांवर शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.राजकिरण ढवारे यांनी महादेव सुपलकर यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. तर महादेव सुपलकर यांनी राजकिरण ढवारे यांनी लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.
ढोकी – आरोपी नामे- राजकिरण प्रकाश ढवारे, रा. ढोकी ता.जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 06.45 वा. सु.ग्रामपंचायत समोर ढोकी येथे फिर्यादी नामे-महादेव नारायण सुपलकर, वय 36 वर्षे, रा. तळगल्ली ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव सुपलकर यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352, 351(2) 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी –आरोपी नामे-महादेव नारायण सुपलकर, रा.तळगल्ली ढोकी ता.जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 06.45 वा. सु.ग्रामपंचायत समोर ढोकी येथे फिर्यादी नामे- राजकिरण प्रकाश ढवारे वय 42 वर्षे, रा. भिमनगर ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बतईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजकिरण ढवारे यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 351(2) 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.