लोहारा – लोहारा येथे एका कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. फुलचंद लिंबराज कांबळे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हनुमंत शेषेराव रसाळ, श्रावण शिवाजी रसाळ आणि दादा वसंत रसाळ या तिघांनी त्यांना, त्यांच्या पत्नीला आणि मुलीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ५ वाजता घडली.
आरोपी नामे-हनुमंत शेषेराव रसाळ, श्रावण शिवाजी रसाळ,दादा वसंत रसाळ सर्व रा. लोहारा खु. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 17.00 वा. सु.लोहारा खु. फिर्यादी नामे-फुलचंद लिंबराज कांबळे, वय 40 वर्षे, रा. लोहारा खु. ता.लोहारा जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी मुलगी यांना मुलीकडे बघून का हासला असे विचाण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-फुलचंद कांबळे यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 115(2), 352, 79, 3(5), सह अ.जा.ज.अ.प्र.अधिनियम कलम 3(1)(आर)(एस), 3(1) (डब्ल्यु),(ii) 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा येथे वृद्धाला आणि त्यांच्या मुलाला मारहाण, जीवे मारण्याची धमकी
लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे एका ७१ वर्षीय वृद्धाला आणि त्यांच्या मुलाला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी, दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
फुलचंद लिंबराज कांबळे, शुभम फुलचंद कांबळे, अंकुश लिंबराज कांबळे, लहु लिंबराज कांबळे, नंदा फुलचंद कांबळे आणि ताई लिंबराज कांबळे अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींनी शेषेराव बाबाराव रसाळ (वय ७१) आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेची तक्रार शेषेराव रसाळ यांनी शनिवारी, दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी लोहारा पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 118(2), 351 (2)(3), 352, 189(2),190, 191(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.