धाराशिव: धाराशिवच्या लाच प्राध्यापिकेचा RDC पदासाठीचा अजब प्रवास म्हणजे खरोखरच एक विनोदी सिनेमाचा विषय ठरेल. मंत्रालयाच्या दारोदार भटकंतीनंतर, बीड आणि लातूरच्या “No Entry” पाट्या पाहून ती शेवटी धाराशिवकडे वळली. तिची मिशन होती – “RDC पदाची खुर्ची गाठायची, पण लाच देऊनच!”
बोगस कलेक्टरवर जादूचा प्रयोग
जिल्ह्याचं RDC पद महिनोंमहिने रिक्त होतं. कांबळे साहेब बीडच्या निवडणुकीसाठी तिकडे रवाना झाले, अन् ही प्राध्यापिका आपला नशीब अजमावण्यासाठी धाराशिवकडे धावली. सर्वत्र भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेली ही लाच प्राध्यापिका बोगस कलेक्टरला भेटली. तो कलेक्टर तिच्या “जादूच्या प्रयोगां”ला बळी पडला की काय, कारण त्याने चक्क “मी हिला निवडणुकीचं कुठलंही काम देणार नाही” असा लेखी जबाब देऊन टाकला.
खुर्चीवर शोभा कमी, गोंधळ जास्त
ऑर्डरची वाट न पाहता ही प्राध्यापिका कर्मचाऱ्यांना सांगत सुटली – “होणारच मी तुमची RDC!” तिच्या आत्मविश्वासाचा फुगा एवढा फुगला होता की सोपस्कार पूर्ण होताच ती थेट RDC च्या खुर्चीवर जाऊन “चीपकली.” पण इथे एक गंमत घडली – त्या खुर्चीची ‘शोभा’ हरवली, अशी कर्मचाऱ्यांनी कानगोष्टी सुरू केल्या!
धाराशिवच्या कार्यालयात विनोदाचा विषय
धाराशिवच्या कर्मचार्यांमध्ये आता एकच चर्चा – “ही प्राध्यापिका खुर्चीच्या लायक आहे का? की खुर्चीच तिच्या लायक नाही?” या साऱ्या गोंधळामुळे कार्यालयात थोडं हसू अन् बराचसा गोंधळ सुरू आहे.
लाच प्राध्यापिकेचा हा किस्सा प्रशासनातल्या भ्रष्टाचारावर विनोदी टीका करण्याचा उत्तम नमुना ठरला आहे. आता खरं प्रश्न हा आहे की ही ‘शोभा’ पुन्हा खुर्चीत येईल का, की खुर्चीच नव्याने शोभा शोधायला लागेल?