धाराशिव | राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धाराशिव जिल्हा सरचिटणीस सतीश वैद्य यांनी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर फेसबुक पोस्टद्वारे निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यातून राणा पाटील यांच्या कार्यकर्त्यांची एकही सोशल मीडिया पोस्ट दिसली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सतीश वैद्य यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये, “धाराशिव जिल्ह्यातून मोदीजी आणि धर्मेंद्र प्रधान यांना पाठिंब्यासाठी एकाही राणा दादा पाटील यांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट दिसली नाही. याचा अर्थ असा होतो, सगळे फक्त मलीद्यासाठी,” असा टोला लगावला आहे.
राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार असतानाच त्यांच्या समर्थकांबाबत करण्यात आलेल्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वैद्य यांच्या या पोस्टनंतर भाजप आणि राणा पाटील समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





